नांदुरा : गेल्या बऱ्याच वर्षापासून येथील जगप्रसिद्ध १०५ फुट हनुमानाच्या मूर्तीला रंगरंगोटी केली नव्हती. लॉकडाऊन उघडल्यानंतर या हनुमान मुर्तीला रंगरंगोटी करायला सुरुवात झाली आहे. 2 ते 3 वर्षातुन एकदा या मुर्तीला रंगरंगोटी करण्यात येत असते तसेच थोडी दुरुस्ती सुद्धा करण्यात येते, रंगरंगोटी केल्या वर मुर्तिची शोभा अजुन वाढत आहे. महामार्ग क्र.6 वर ही मुर्ति असल्याने दररोज हजारो भाविक हनुमान मूर्तीचे दर्शन घेत असतात.या हनुमानाच्या मुर्तिची देशातील तिसऱ्या क्रमांकाची मुर्ती म्हणुन नोंद झालेली आहे.गेल्या १४ वर्षांपासून ३५० किलोचा हार हनुमान जयंतीला मूर्तीला अर्पण करण्याची प्रथा सुद्धा आहे. मूर्तीसाठी लागले ८०० क्विंटल लोखंड आंध्र प्रदेशातील पेद्दापुरम येथील जॉन बाबू या मूर्तिकाराने हनुमानाची ही १०५ फुटी मूर्ती २१० दिवस अथक प्रयत्न करून पूर्णत्वास नेली.८ नोव्हेंबर २००१ रोजी गोवर्धन पीठ जगन्नाथ पुरीचे जगद्गुरू शंकराचार्य श्री श्री १०८ निश्चलानंदजी महाराज यांच्या हस्ते या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. मूर्ती बनवण्यासाठी ८०० क्विंटल लोखंड, ३७५ ट्रक सिमेंट वापरण्यात आले. बुलडाणा जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळा पैकी एक नांदुरा येथील हनुमान मूर्ती आहे.
previous post