मृत संदिग्ध रुग्णावर झाले होते उपचार
नांदुरा : दोन दिवसांपूर्वी नांदुरा शहरातील एका ७० वर्षीय संदिग्ध रुग्णाचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या रुग्णावर नांदुरा येथील एका हॉस्पिटलमध्ये काही काळ उपचार करण्यात आले होते. त्यामुळेखबरदारीचा उपाय म्हणून हे हॉस्पिटल आरोग्य विभागाने २६ जून रोजी सीलकेले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. नांदुरा येथे खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीस त्रास होत असल्याने त्यास नांदुरा येथील एका डॉक्टरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या संदिग्ध रुग्णाचा मध्यंतरीमृत्यू झाला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ज्या रुग्णालयात या वृद्धावर उपाचर करण्यात आले होते ते रुग्णालय आरोग्य विभागाने सील केले आहे.