खामगाव : बाळापूर नाका ते नांदुरा बायपास पर्यंत राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरणाची कामे निकृष्ट दर्जाचे झाले असून संबंधित कंत्राटदाराने मनमर्जी प्रमाणे काम केल्यामुळे सदर शिरस्ता झाला असून त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचत आहे. त्यामुळे वाहनधारकांना व नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. नागमोडी रस्ता बनल्यामुळे रस्त्यावर अनेक अपघात सुद्धा होत आहे. नांदूरा रोड सिमेंट रस्त्याच्या सदोष कामाबाबत स्पेशल ऑडिट ची मागणी करणार असल्याची मागणी माजी आ. राणा दिलीपकुमार सानंदा यांनी सांगितला आहे. या रस्ता कामाबाबत सानंदा यांनी सांगितले की, खामगांव शहरातून जाणाऱ्या बाळापूर नाका ते नांदूरा रोड पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम हे ५२ कोटी रुपयांची असून त्यापैकी अंदाजे ४५ कोटी रुपये या रस्ता कामावर खर्च झालेले आहेत. हे काम सुरू असताना अनेक नागरिकांनी रस्ता व नाली बांधकाम बाबत तक्रारी केल्या होत्या.
तसेच कंत्राटदार याने वेळेच्या आत रस्ता काम न केल्यामुळे राष्ट्रीय महामार्गाची तांत्रिक महाप्रबंधक व्ही. टी. ब्राह्मणकर यांच्या वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराला ५ कोटी रुपयांचा दंड देखील झालेला आहे. मोजणी सीटचे पैसे भरल्यानंतर ही मोजणी शीट मिळाली नाही म्हणून कंत्राटदाराने नझुल शीटप्रमाणे या रस्त्याचे काम केले आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचते, नालीचे काम सुद्धा निकृष्ट झाले आहे, नागमोडी वळणाचा रस्ता बनल्यामुळे रस्त्यावर अपघात होऊन अनेक लोकांचे बळी गेले आहेत. सिमेंट रस्ता काम करताना तांत्रिक बाबी व सुरक्षा नियमांना बगल दिली आहे. या रस्त्याचे स्पेशल ऑडिट करून दोषींवर कारवाई व्हावी याबाबतची मागणी मंत्री व वरिष्ठांकडे करणार असल्याचेही माजी आ. दिलीपकुमार सानंदा यांनी सांगितले आहे.