खामगांव: १५ फेब्रुवारी रोजी सुटाळा खुर्द येथे अंगणवाडी सेविका आशा सेविका मदतनीस ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमामधे सुटाळा खुर्द सर्वप्रथम निलेश देशमुख सरपंच जयेश वावगे उपसरपंच तसेच सदस्यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर सर्व नवनिर्वाचितांचा अंगणवाडी सेविका,आशा गटप्रवर्तक व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या हस्ते मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. ग्रामपंचायत मध्ये आशा सेविका, अंगणवाडी सेविकांचा सहभाग या विषयावर अंगणवाडी सेविका आशा दहिवटी यांनी मागील कामाचा आढावा घेऊन यापुढे अशीच कामे करण्याचा संकल्प घेतला. सदर कार्यक्रमाची सांगता अध्यक्षीय भाषणाने करण्यात आली, तर आभार प्रदर्शन व संचालन अंगणवाडी सेविका ढोरे यांनी केले. या कार्यक्रमाकरिता आशा सेविका वंदना इंगळे,रेखा राऊत, आशा दहिभाते कल्पना बावस्कर,सुनिता घाटे, वर्षा मुक्कावर, मदतनीस रंजना दही,आशा कळसकार, देवकाबाई खंडारे,सगुना तायडे व ग्रामपंचायत कर्मचारी संतोष वानखडे प्रकाश बगाडे व गणेश उंबरकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
previous post