चिखली : संपूर्ण देशासह महाराष्ट्रात कोविड १९ हा संसर्गजन्य आजार मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने साथ रोग प्रतिबंधक कायदा १८९७ नुसार आजाराच्या प्रादुर्भावास आळा घालण्याकरिता शासनाने बुलडाणा जिल्हा देखील लॉक डाऊन केलेला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता कलम १४४ फौ. नुसार संचारबंदीचे आदेश लागू असून चिखली मध्ये सुद्धा धार्मिक स्थळावर सामूहिक प्रार्थना, पूजा, नमाज पठण इत्यादि कार्यक्रमाकारिता पांच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्रित येण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. परंतु ताबलीक जमातीचा मरकज प्रकरण सध्या पूर्ण देशात गाजत असतांनाच चिखली शहरामध्ये सुद्धा शुक्रवार दिनांक ३ एप्रिल शुक्रवार रोजी जुम्मा नमाज अदा करण्याकरिता चिखली स्थित बारभाई मोहल्ला मधील जामा मस्जिद येथे पंधरा ते वीस लोकांनी मस्जिद च्या गेटवर जमा होऊन नमाज पठणाकरिता मस्जिद मध्ये जाण्यासाठी गर्दी केली होती.
परंतु सदर बाबीची गुप्त माहिती पेट्रोलिंग दरम्यान चिखलीचे ठाणेदार गुलाबराव वाघ यांना मिळाल्यावरून सदर ठिकाणी जाऊन मलिक खान अताउल्लाह खान (३६), शेख नाजीम ठेकेदार (३२), शेख अतहर मास्टर (२७), हाजी रमजानी मिस्त्री (५५), मुजीब महम्मद रूफिक जक्कीवाला (३५), अयाज ठेकेदार रेतिवाले (५५), राजिक खान शफीक खान (३२- अपंग), शेख अमन शेख वजीर (६२), शेख अफरोज शेख रमजानी (३०), शेख गुड्डू शेख रमजानी (२४), जुनैद खान अताउल्लाह खान (३५), हाजी अताउल्लाह खान (६५) सर्व रा. बारभाई मोहल्ला चिखली यांचेवर संचारबंदी कायद्याचे उल्लंनघन केल्यावरून पो.हे.कॉ. विक्रम काकड यांचे लेखी फिर्यादी वरून पोलीस स्टेशन चिखली येथे अप.नं. २३५/२०२० कलम १८८, २६९ भांदवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाई मध्ये ठाणेदार पोलीस निरीक्षक गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. किरण खाडे, पो.हे.कॉ. विक्रम काकड, पो.ना. राहुल मेहुनकर, पो.कॉ. पुरूषोत्तम आघाव सहभागी झाले होते.