खामगांव : खामगांव – नांदुरा मार्गावरील नंद टॉवर मधील बालरोग तज्ञ कडे उपचारासाठी आलेला बाळापूर येथील वृद्ध पॉझिटिव्ह निघाला होता त्यामुळे सदर रुग्णांच्या संपर्कातील डॉक्टरांसह दहा जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. या दहा जणांचे ही स्वॅब अहवाल प्राप्त झाले असून ते सर्व निगेटिव्ह आले आहेत, त्यामुळे नागरिकांच्या मनातील भीती दूर झाली आहे. याबाबत असे की येथील नांदुरा मार्गावरील नंद टॉवर मध्ये बालरोग तज्ञाकडे सर्दी खोकल्याचा त्रास असल्याने बाळापूर येथील 78 वर्षीय वृद्ध उपचारासाठी भरती झाला होता दरम्यान सात जून रोजी दुपारी त्याचे स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले होते. दरम्यान त्या वृद्धाच्या संपर्कात डॉक्टरसह आलेल्या दहा जणांना क्वारंटाईन करून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्या दहा जणांचे स्वॅब रिपोर्ट बुधवारी सकाळी निगेटिव्ह आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.