January 1, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र राजकीय

धनगर समाजाच्या वतीने विविध मागण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन

खामगांव : धनगर समाजाच्या घटनादत्त अनुसुचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणी या मागणीसाठी आजवर अनेकदा आश्वासन दिली गेली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या ३४२ व्या कलमानुसार दिलेल्या अनुसुचित जमाती या आरक्षण वादीत सष्टपणे समावेश केला असताना केवळ धनगड या अस्तित्वहीन समाज पुढे करून धनगर समाजावर अन्याय केला जात आहे. आपण यापुर्वी धनगर समाजाच्या या मागणीची पुर्तता करण्याचे आश्वासन दिले आहे. ते पुर्ण करावे या प्रमुख मागणीसह खालील मागण्या तात्काळ पुर्ण कराव्यात. धनगर समाजाच्या घटनादत्त अनुसुचित जामातीच्या आरक्षणाची त्वरीत अंमलबजावणी करावी.

मुंबई उच्च न्यायालयात एस.टी.आरक्षणाची दाखल केलेली याचीका वेळ न लावता फास्टट्रॅक न्यायालयात काढावी. मागील सरकारने धनगरांसाठी जाहिर केलेल्या आदिवासींच्या सवलती त्वरीत लागु करून मंजूरन केलेल्या १००० कोटी रूपयांचा निधी तात्काळ मंजुर करावा. धनगर समाजातील मेंढपाळावर अलिकडे होत असलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर मेंढपालाच्या सुरक्षेसाठी कडक कायदे करून संरक्षण द्यावे. धनगर समाजाच्या घटनादत्त अनुसुचीत जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी होईपर्यंत कोणतीही सरकारी नोकर भरती करू नये. अश्या विविध मागण्याचे निवेदन धनगर समाजाच्या वतीने आज तहसीलदार यांना देण्यात आले.यावेळी योगेश खराटे,अतुल लोणाग्रे,रवी गुरव, शांताराम बोधे यांच्यासह आदी उपस्थित होते.

Related posts

SDPO पथकाचा जुगार अड्यावर छापा ; १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

nirbhid swarajya

कोरोना लस घेतलेला कर्मचारी पॉझिटिव्ह !

nirbhid swarajya

गावठी दारू विक्रेत्यांविरूध्द कारवाई

nirbhid swarajya
error: Content is protected !!