विद्यार्थिनीला कक्षात बोलावून केले अश्लील चाळे…
पोक्सो सह विनयभंगाचा गुन्हा दाखल, मास्तर फरार…
पिंपळगाव राजा:गुरु आणि शिष्याचं नातं अतिशय पवित्र मानलं जातं,मात्र गेल्या काही दिवसांपासून याच पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या घटना समोर येत आहेत.पुन्हा अशीच एक दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली असून,मुख्याध्यापकाने आपल्या पाचवीतील विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केले आहेत,विद्यार्थिनीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून या वासनांद मुख्याध्यापकावर पोक्सो सह विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय.तर आरोपी मास्तर सध्या फरार असल्याने पोलीस त्याचा शोध घेतायेत.नांदुरा तालुक्यातील मुरंबा येथे जिल्हा परिषद शाळेवर देविदास डिगोळे हा
मुख्याध्यापक आहे,त्याने आपल्याच शाळेतील पाचव्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला मुख्याध्यापक कक्षात बोलावून शिक्षेच्या नावाखाली तिच्या शरीरावरून वाईट उद्देशाने हात फिरवत अश्लील चाळे केले,आणि हा प्रकार कुणाला सांगितल्यास जिवे मारन्याची धमकी दिली.मात्र घरी जाऊन या विद्यार्थिनीने हा संपूर्ण प्रकार आपल्या वडिलांना सांगितल्यानंतर वडिलांनी तात्काळ पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, या तक्रारीवरून आरोपी मुख्याध्यापक देविदास डीगोळे याच्यावर पोक्सो सह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.आरोपी मुख्याध्यापक सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.अलीकडच्या काळामध्ये काही शिक्षकांची नीतिमत्ता ढासळत असून,बुलढाणा जिल्ह्यात एका महिन्यातली ही तिसरी घटना आहे.यामुळे आपल्या मुलींच्या सुरक्षितते संदर्भात पालकांमध्ये आता चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.त्यामुळे अश्या वासनांद मास्तरांच्या नांग्या वेळीच ठेचने अत्यंत गरजेचे झाले आहे.