मेहकर : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोणगाव पोलीस स्टेशनमधील एका कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट पाँझिटिव्ह आल्याने अधिकाऱ्यासह सर्व ३६ कर्मचारी क्वारंटाईन करून या पोलीस स्टेशनचे कामकाच मेहकर पोलिस स्टेशन कडे देण्यात आले आहे उपविभागीय पोलीस अधिकारी डी बी तडवी यांनी ही माहिती दिली आहे. डोणगाव पोलीस स्टेशनचा २८ वर्षीय कर्मचाऱ्याचा रिपोर्ट पाँझिटिव्ह आला आहे.डोणगाव पोलिस स्टेशन मध्ये अधिकारी व कर्मचारी मिळून ३६ जण आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना मेहकर येथे कोवीड केअर सेंटर मध्ये क्वारंटाईन करण्यात येऊन त्यांच्या रँपीड टेस्ट होणार आहेत. तर पोलीस स्टेशनचे कामकाज मेहकर पोलिस स्टेशन कडे देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त तालुक्यातील लोणी गवळी येथे कोरोना पॉझिटिव्ह आठ रुग्ण आढळून आल्याने संपूर्ण गावाची आरोग्य तपासणी करण्यात आली
next post