भंगारचे वाहन सोडून लाटला मलीदा
खामगाव:वरिष्ठांना अंधारात ठेवून पोलीस खात्यातील पथक मलिदा लाटत आहे. शहर पोलिस स्टेशनच्या डीबी पथकाने नुकताच दोन लाखाचा गुटखा परस्पर फस्त केल्याची चर्चा आहे. दरम्यान, या पथकाने भंगारचे संशयीत वाहन सोडून डीबी पथकातील सदस्यांनी रक्कमेवर फासा टाकला. त्यामुळे शहर पोलिस स्टेशनच्या निरिक्षकांनी काही दिवसांपूर्वीच संबंधितांची शाळा भरविल्याची चर्चा आहे.अपर पोलीस अधिक्षकाचे पथक अपर पोलीस अधिक्षकांची प्रतिमा मलिन करण्यात गुंतले असतानाच,डीबी पथकाकडून शहर पोलिस स्टेशनच्या निरिक्षकांना अंधारात ठेऊन डाव साधत आहे.डीबी पथकातील काही सदस्यांकडून गुटखा पकडण्यात आला. वरिष्ठांपासून कारवाई लपवून तडजोडीच्या रक्कम परस्पर लाटण्यात आली. त्याचवेळी एका भंगाराच्या एका वाहनातही सेटींग करण्यात आली. याची माहिती शहर पोलिस निरिक्षकांना मिळाली. डीबी पथकातील सदस्यांचे बिंग फुटल्यामुळे संतप्त झालेल्या शहर पोलीस निरिक्षकांनी चक्क केबिनमध्येच संबंधितांची शाळा भरविली.
याबाबत शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांना विचारणा केली असता या प्रकरणाची खात्री करून चौकशी करू असे निर्भिड स्वराज्य सोबत बोलताना त्यांनी सांगितले
वरिष्ठांनी धरले धारेवर…
गत काही दिवसांपासून डीबी पथकातील सदस्यांकडून वरिष्ठांची दिशाभूल केली जात आहे. मलिदा लाटल्या जात असल्याचे निदर्शनास येताच, पोलिस निरिक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी संबंधितांना चांगलेच धारेवर धरल्याची चर्चा आहे.