November 20, 2025
जळगांव जामोद जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र विदर्भ शेगांव संग्रामपूर

दोन मोटारसायकली समोरासमोर धडकल्या; एक जण जागीच ठार, दोन गंभीर….

संग्रामपुर: भरधाव येणाऱ्या दोन मोटारसायकली समोरासमोर धडकल्याने एक जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना. पातूर्डा ते वरवट बकाल मार्गावरील नेकनामपूर फाट्याजवळ घडली. शेख तसलीम शेख नादु रा. तेल्हारा, जि अकोला असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. या अपघातात शेख रिजवान शेख इरफान व शेख इम्रान शेख इरफान कवठळ येथिल जखमी झाले आहेत. नेकनामपूर फाट्याजवळ अपघात झाल्यानंतर जखमींना उपचारासाठी शेगाव येथील सईबाई मोठे शासकिय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र शेख तसलीम याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी खामगावला हलविण्यात आले आहे.

Related posts

वाडी येथे अवैध दारू विक्री जोरात

nirbhid swarajya

बुलडाण्यात भावाने केला सख्या बहिणीचा खून….

nirbhid swarajya

खामगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा तालुक्यातील सरपंचांची मागणी…

nirbhid swarajya
error: Content is protected !!