October 6, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा

दोन ठिकाणी वीज चोरी पकडली

खामगाव : तालुक्यातील अटाळी येथील वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता अनुपसिंग किशोरसिंग राजपुत यांनी महावितरणच्या वीज चोरी शोध मोहीमेअंतर्गत शिर्ला नेमाने येथे देवराव मोहन चव्हाण यांच्या घरी जावुन पंचासमक्ष तपासणी केली असता देवराव चव्हाण यांनी आकोडा टाकुन वीज चोरी केल्याचे आढळून आले. त्यांनी मागील १२ महिन्यात एकुण ६०७ युनिट १० हजार ५०८ रुपयाची चोरी केली.

तसेच शिर्ला नेमाने येथील प्रदीप पांडुरंग नेमाने यांच्या घरी जावुन पंचासमक्ष जाऊन तपासणी केली असता त्यांनी आकोडा टाकुन वीज चोरी केल्याचे आढलुन आले. प्रदीप नेमाने यांनी मागील १२ महिन्यात एकुण १६३ युनिट १५ हजार ७६० रूपयांची चोरी केली. या दोन्ही प्रकरणी कनिष्ठ अभियंता अनुपसिंग राजपुत यांच्या फिर्यादीवरान शहर पोलिसांनी उपरोक्त आरोपीविरुध्द ‘भारतीय विद्युत कायदा कलम १३५ नुसार गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास शहर पोलीस स्टेशनच्या पीएसआय रोशनी अहिरे करीत आहेत.

Related posts

किमान आधारभुत किंमत खरेदी योजनंतर्गत मका/ज्वारी शासकीय खरेदीचा शुभारंभ

nirbhid swarajya

खामगाव बाजार समितीमध्ये अडते-व्यापाऱ्यांचा अघोषित बंद

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 208 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 48 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!