परस्पर विरोधी गुन्हे दाखल…
खामगाव तालुक्यातील बोरीअडगाव येथील घटना…
खामगाव : तालुक्यातील बोरीअडगाव येथे लहान मुलांच्या किरकोळ वादावरून दोन गटात सशस्त्र हाणामारी झाली ज्यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी वरून गुन्हे दाखल करण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळी सात वाजता चे सुमारास बोरीअडगाव येथे लहान मुलांचे किरकोळ वादाचे पुनर्वसन दोन गटाच्या हाणामारीत झाले असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय सभेचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील यांचे सह पत्नी व मुलगा जखमी असून त्यांच्या अकोला येथे उपचार सुरू आहेत तर दुसऱ्या गटातील दोन जण जखमी असून त्यांच्या खामगाव येथे उपचार सुरू आहेत, रावसाहेब पाटील यांनी दिलेल्या तक्रारी वरून सोळा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर प्रमोद टिकर यांनी दिलेल्या तक्रारी वरून दोन जनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.