November 20, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा

दोन गटात तुफान हाणामारी ; २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

खामगाव : येथील आठवडी बाजार मध्ये असलेल्या भंगार दुकान व्यवसायिक राजेंद्र इंगळे व त्यांचे भाऊ, मुलांना मारहाण झाल्याची घटना २७ मार्च रोजी चे दुपारी २ वाजताच्या सुमारास आठवडी बाजार परिसरात घडली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, राजेंद्र नामदेवराव इंगळे वय ५६ यांचा आठवडी बाजार मधे भंगार दुकानाचा व्यवसाय असून २७ मार्च रोजी आरोपी मोहन अहिर हे त्यांच्या दुकानात येऊन त्यांना म्हणाले की, तुझी दुकान नगरपरिषदेच्या जागेमध्ये असून त्याचे मला तुम्हाला पैसे द्यावे लागतील नाहीतर मी तुझी दुकान इथून हटवून टाकेल.

या कारणावरून इंगळे यांना शिवीगाळ करून गैर कायदेशीर मंडळी जमवुन राजेंद्र इंगळे व त्यांचे भाऊ,मुलगा यांना लोखंडी रॉड, हातोडी,सेंट्रींग चे राफ्टर,लोखंडी झारे घेऊन मारहाण केली. त्यानंतर त्यांचा मुलगा अभयला डोक्यावर हातोडी, लोखंडी पाईप, लोखंडी झारे ने मारहाण करून गंभीर जखमी केले. राजेंद्र इंगळे यांनी २८ मार्च रोजी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी मोहन अहिर, रामु अहीर, रतन अहिर, मनोज अहिर ,आशिष अहिर, अक्षय अहिर ,आदित्य अहिर ,रोशन अहीर, श्याम अहिर ,आकाश वायचाळ ,विक्की पारधी, राम वगर, बाळू अतकरे ,रघु तिवारी ,विलास वाशिमकर व आणखी ७ ते ८ इसम यांचे विरुद्ध कलम ३२५, १४३, १४७,१४८,१४९,५०४ भादवी नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय पांडुरंग इंगळे हे करत आहे.

Related posts

लोकनेते स्व.भाऊसाहेब फुंडकर यांचे पुण्यतिथी निमित्त तोडकर परिवाराचे वतीने अन्नदान…

nirbhid swarajya

जिल्हाधिकारी यांनी केले कोविड नियम पाळण्याचे आवहन

nirbhid swarajya

एकाच कुटुंबातील ४ जणांचा विद्युत ताराचा शॉक लागून मृत्यू

nirbhid swarajya
error: Content is protected !!