२ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
शेगाव : येथील वाटिका चौकातून देशी व विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या तिघांना शहर पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. यावेळी २ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शेगाव शहर पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा एलसीबी विभागाला गुप्त माहिती मिळाली की वाहन क्रमांक एम एच १९ बी यु १९४७ या क्रमांकाच्या इंडिका कार वाहनातून देशी व विदेशी दारूची अवैध वाहतूक होत आहे. बुलढाणा गुन्हे अन्वेषण विभागाने जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गीते यांच्या आदेशाने एपीआय नागेश कुमार चतरकर पीएसआय निलेश शेळके, पीएसआय श्रीकांत जिंदमवार, नायक पोलीस कॉन्स्टेबल गजानन आहेर यांनी शेगाव येथील वाटिका चौकांमध्ये सापळा रचून एम एच १९ बी यु १९४७ क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाची इंडिका कार या वाहनाला थांबविले. यावेळी वाहनांची तपासणी केली असता इम्पेरियल ब्ल्यू कंपनीची ७० नग शिेश्या १८० एम एल किंमत २४ हजार ६४० रुपये ,मॅकडॉल व्हिस्की १८० एम एल च्या ८६ शिष्या किंमत १२ हजार ९०० रुपये, देशी दारू टॅंगो १९२ नग शिश्या किंमत ९९८४ रुपये तसेच आरोपीकडून नगदी २७५० रुपये ,मोबाईल हँडसेट किंमत ३० हजार, इंडिका कार क्रमांक एम एच १९ बी यु १९४७ किंमत २ लाख रुपये असा एकूण २ लाख ८० हजार २७४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी अमोल वसंत भोई वय २६ रा. कुरा ता.मुक्ताईनगर जि. जळगाव खान्देश, निलेश महादेव तायडे रा. भोटा ता. मुक्ताईनगर जि.जळगाव व वाहन चालक हरीश गणपत इंगळे वय ३० रा. कुरा ता. मुक्ताईनगर जि. जळगाव अशा तिघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ६५ अ ई महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम नुसार सह कलम १८८,२६९,२७० भादवि कलम तीन साथीचे रोग प्रतिबंध अधिनियम ६ कलम ५१ ब राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दंदे करीत आहेत.
