November 20, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा मनोरंजन महाराष्ट्र

देशावरील कोरोनाचे संकट घेऊन जा; प्रार्थना करत दिला बाप्पा ला निरोप

खामगांव : मांगल्याचे प्रतिक हीच गणरायाची खरी ओळख. सुःख, समृध्दी, घेऊन दहा दिवसांपूर्वी विराजमान झालेल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाला आज भक्तीपूर्ण वातावरणात निरोप दिला. कोरोना संकटामुळे यंदा कुठल्याही प्रकारची मिरवणुक तसेच गाजावाजा न करता अत्यंत साध्या पध्दतीने श्रींचे विसर्जन पार पडले आहे.खामगाव येथील सराफा भागातील मानाचा लाकडी गणपती हा दरवर्षी थाटामाटात विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रथम क्रमांकावर त्याचा मान असतो पण मात्र यावर्षी कोणाच्या सावट मुळे गणपती विसर्जन हे अगदी साध्या पद्धतीने करण्यात आले आहे यामध्ये लाकडी गणपतीची जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी विधिवत पूजा व आरती करून त्यांच्या हस्ते श्री गणेश मूर्ती लाकडी गणपतीचे विसर्जन करण्यात आले व त्यानंतर लाकडी गणपतीची प्रतिकृती लहान मूर्ती वाजत गाजत बाहेर काढण्यात आली व सर्व गणेश भक्तांनी पुरणाचे संकट दूर करण्यासाठी बाप्पाला विनंती केली.सार्वजनिक गणेश मंडळे व घरगुती गणपतीचे विसर्जनासाठी नगर पालिका, पोलीस प्रशासन व सामाजिक संस्थांच्या वतीने फिरत्या हौदांसह मूर्ती दान आणि संकलनाची व्यवस्था त्या त्या परिसरात केली होती. दरवर्षी वाजत-गाजत विसर्जन मिरवणूक काढून गणरायाला भक्तांकडून निरोप दिला जातो. ढोलताशांचा गजर, बँड पथकांचे वादन, सणई चौघड्याचा मंगलमयी सूर,रांगोळीच्या पाउघड्या, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष अशा उत्सहापूर्ण व आनंददायी वातावरणे संपूर्ण शहर बाप्पामय होते. ही वैभवशाली मिरवणूक पाहण्यासाठी गणेशभक्त विसर्जन मिरवणूक मार्गावर गर्दी करतात. कोरोनामुळे मिरवणुकीची ही पंरपरा यंदा खंडित झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणूनच शासन, पालिका आणि प्रशासनाकडून गर्दी न करता साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचे आवाहन गणेश मंडळांना करण्यात आले होते. या आवाहानाला प्रतिसाद देत गणेश मंडळांनी अतिशय साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला. पोलीस, नगरपालिका आणि प्रशासनाच्या सुचनेनुसार उत्सवाचा समारोपही साध्या पद्धतीने केला.

Related posts

जिल्ह्यात आज प्राप्त 41 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 05 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

आणि तिचा वाढदिवशीच कोरोनाने घेतला बळी…

nirbhid swarajya

किराणा दुकान फोडून मुद्देमाल लंपास

nirbhid swarajya
error: Content is protected !!