डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या सृतिदिनी आवाहन
खामगाव : देशविघातक प्रवृत्तीला वेळीच ठेचा व देशाला एकसंघ करून अधिक बळकट करा हीच डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांना खरी आदरांजली असेल असे प्रतिपादन भाजपा सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेश संयोजक सागरदादा फुंडकर यांनी केले. भारतीय जनसंघाचे संस्थापक , थोर विचारवंत, काश्मीर साठी बलिदान देणारे डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम स्थानिक भाजप कार्यालयात पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. सर्वप्रथम सागरदादा फुंडकर व नगराध्यक्षा सौ. अनिताताई डवरे यांनीं डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन केले व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले . या
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजप शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित होते. यावेळी सागरदादा फुंडकर यांनी डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जीवनावर विस्तृतपणे प्रकाश टाकला. पुढे बोलताना ते म्हणाले की डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी हे खरे राष्ट्रवादी विचारसारणीचे देशभक्त होते. स्वातंत्रवीर सावरकर यांचे ते अतिशय प्रिय होते, त्यांचे आग्रहाने त्यांनी हिंदू महासभेचे काम केले. तसेच सावरकर यांच्या अग्रहानेच ते पंडित नेहरु यांच्या मंत्रिमंडळत सहभागी झाले, व देशभर फिरून त्यांनी देशाला औद्योगिक क्षेत्रात बळकटी देऊन रोजगारनिर्मिती केली. त्यांनी अनेक क्षेत्रात देशाची प्रगती सुधारण्यासाठी प्रयन्त केले. परंतु नेहरू सरकारच्या काश्मीर सारख्या काही देशविरोधी नीती त्यांना पटल्या नाहीत त्यामुळे त्यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला. एकाच देशात दोन प्रधान व दोन निशाण चालणार नाहीत या राष्ट्रवादी विचाराने त्यांनी काश्मीर मधील कलम ३७० हटविण्यासाठी तीव्र सत्याग्रह सुरू केला. त्यावेळी त्यांना अटक करून तुरुंगात डांबले व तेथेच त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. काश्मीर साठी त्यांचे बलिदान जनसंघ नंतर भाजप ने व्यर्थ जाऊ नये यासाठी लढा सुरूच ठेवला. अखेर नरेंद्र मोदी यांच्या सरकारने कलम 370 हटविले.
डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदानामुळेच आज काश्मीर मध्ये देशाचा तिरंगा अभिमानाने फडकत असून ते मुख्य प्रवाहात आले आहे. अश्या या थोर विचारवंत राष्ट्रभक्ताला त्यांच्या स्मृतीदिनी खरी आदरांजली वाहायची असेल तर आजही देशात सुरू असलेल्या विविध देशविघातक प्रवृत्तीला वेळीच आला घालून देशाला एकसंघ करून अधिक बळकट करा असे आवाहन याप्रसंगी सागर फुंडकर यांनी केले. यावेळी भाजप जिल्हा सचिव संजय शिनगारे, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, न प गटनेते राजेंद्र धानोकार,जि प सदस्य डॉ गोपाल गव्हाळे, प स सदस्य विलास काळे, शांताराम बोधे, महादेवराव कांबळे, सत्यनारायण थानवी, नगरसेवक हिरालाल बोर्डे, सतीशअप्पा दुडे, सौ शिवानी कुलकर्णी, अरुण अकोटकर, जितेंद्र पुरोहित,गणेश जाधव, संजय मोहिते, सुरेश घाडगे, विजय उगले, शेखर कुलकर्णी, उमेश चांडक, अनिस जमादार, विध्यार्थी आघाडी शहराध्यक्ष शुभम देशमुख, विजय महाले, राजेश पुरवार, गजानन मुळीक,अशोक मानकर, सुभाष इटणारे, श्रीकांत जोशी, रवी गायगोळ, गौरव ठाकूर, पवन ठाकूर, चंदू धोंडस, गजानन मकेकर, आशिष सुरेखा, पवन राठोड, प्रतीक जाधव, पवन डिक्कर, गणेश परदेशी, आदी भाजप पदाधिकारी ,कार्यकर्त्यांनी डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून नगर पालिकेच्या वतीने शहरात प्लास्टिक मुक्त अभियानास प्रारंभ करण्यात आला. आज शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या भारत कटपीस , मेन रोड ते फरशी भागात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.