खामगांव :- दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा देशमुख मराठा युवक मंडळाचे पुढाकाराने इ.१०वी व इ.१२वी मध्ये गुणवत्तानप्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.देशमुख समाजोन्नती मंडळ,देशमुख महिला मंडळ,देशमुख युवक मंडळ यांच्या वतीने समाजाच्या उन्नतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्या अनुशंगाने देशमुख समाजातील मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे.तसेच पुढील शिक्षणासाठी व करीअर संबधी मार्गदर्शन व्हावे या हेतूने समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचे मार्गदर्शन तसेच मागील वर्षी इ.१०वी/१२वी मध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा रविवार दि.२६ जून राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती अर्थात सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून देशमुख मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी देशमुख समाजोन्नती मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.संतोषदादा देशमुख हे होते तर प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य सी.एम.जाधव सर हे होते सरांनी आपल्या ओघवत्या अभ्यासपूर्ण वाणीने विद्यार्थी व पालकांना करीअर संबंधित मार्गदर्शन करताना ध्येयप्रती समर्पित होऊन अभ्यास करण्याचे आवाहन केले.प्रसिद्ध उद्योगपती मा.श्री.संतोषराव देशमुख यांनी सुद्धा मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांना मोठि ध्येय ठेवा त्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन केले तर राष्ट्रवादीचे नेते मा.श्री.देवेंद्रदादा देशमुख यांनी याप्रसंगी देशमुख समाजातील पाच होतकरु विद्यार्थ्यांना दरवर्षी शिक्षणासाठी प्रत्येकी १०हजार रु मदत करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले काँग्रेस नेते धनंजयदादा देशमुख,प्रसिद्ध बालरोगतज्ञ मा.श्री.डॉ.अमित देशमुख सर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहूल देशमुख, प्रा.सिमाताई देशमुख यांची सुद्धा समयोचित भाषणे झाली देशमुख महिला मंडळाच्या अध्यक्षा अंजलीताई देशमुख युवक अध्यक्ष गिरीश दादा देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाला विषेश अतिथी म्हणून देशमुख समाजोन्नती मंडळाचे सर्व सद्स्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.पंकज देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन राहूल देशमुख यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी देशमुख युवक मंडळाचे निळकंठ बाप्पू देशमुख,वैभव दादा देशमुख,नरेंद्र बाप्पू देशमुख,मनीष बाप्पू देशमुख,संभाजी राजे टाले,मंगेश देशमुख,शरद देशमुख,रविकिरण देशमुख,शंतनू देशमुख,महेश देशमुख आदी पदाधिकाऱ्यांनी परीश्रम घेतले.
खामगाव चिखली जळगांव जामोद जिल्हा नांदुरा बुलडाणा मलकापूर महाराष्ट्र मेहकर शेगांव संग्रामपूर सामाजिक सिंदखेड राजा