डॉ.संजीव राठोड यांचे सहकार्याने मोती बिंदूचे यशस्वी ऑपरेशन
खामगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खामगाव शहरातील कार्यकर्ते व पदाधिकारी खऱ्या अर्थाने समाजकार्य करीत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष देवेंद्र देशमुख यांनी निराधार वृद्ध व्यक्तीच्या डोळ्याचे ऑपरेशनची पूर्ण जबादारी स्वीकारून त्या व्यक्तीला जगण्याची नवी उमेद दिली. आणि खऱ्या अर्थाने राजकारणातुन समाजसेवेचे व्रत तेवत ठेवण्याचे काम देवेंद्र देशमुख करीत असल्याचा प्रत्यय आला. शहरातील शिवाजी फैल भागात राहणारे भिकाजी सोनेने यांना परिसरातील लोक भिका मामा म्हणून ओळखतात. भिका मामा हे निराधार असून पत्नी व मुलीच्या मृत्यु नंतर एकटेच जीवन प्रवास करीत आहेत. त्यांची दिनचर्या मोल मजुरी करून येईल त्यात भागवायची अशीच… कोरोना काळात दोन वेळचे जेवणाची चिंता त्यात दवाखाना व इतर उपचार या बद्दल विचारही करणे अशक्यच. अशी परिस्थितीत असताना त्यांचे डोळ्यात मोतीबिंदू झाल्याने दृष्टी कमजोर होत होती. परंतु सांगणार कुणाला, काळजी घेणार घरात कुणी नाही. कुणाचा सहारा नसल्याने आधीच बिकट परिस्थिती त्यात जर का अंधत्व आले तर…. विचार करूनही अंगावर शहारे येतात. भिका मामा मदतीसाठी देवाला प्रार्थना करीत होते .देवाने सुद्धा त्यांचे प्रार्थनेला प्रतिसाद दिला असावा आणि त्यांच्याच परिसरात राहणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहर अध्यक्ष आकाश खरपाडे यांनी भिका मामा यांची परिस्थिती देवेंद्र देशमुख यांना सांगितली.
आणि क्षणाचाही विलंब न करता मदतीला देवदूत बनून धावून आले ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शहर अध्यक्ष तथा एकमेव नगरसेवक देवेंद्र देशमुख. लगेच भिका मामा यांना घेऊन शहरातील नामांकित डोळ्यांचे तज्ञ असलेले डॉ. संजीव राठोड यांचेकडे घेऊन गेलेत आणि त्यांचे सर्व चेकअप करून आज दि.२३ एप्रिल रोजी त्यांचेवर यशस्वीपणे मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रिया केल्यानंतर बाहेर आलेल्या भिका मामा यांना आपली दृष्टी जाणार नाही, आपण पुन्हा जगण्यासाठी स्वालंबीराहू याचे समाधान व्यक्त केले. ज्या युवकाने त्यांचे दुःख व परिस्थिती समजून घेतली ते आकाश खरपाडे व देवदूत सारखे धावून येऊन सर्वोतोपरी मदत केली ते देवेंद्र देशमुख आणि डॉ. संजीव राठोड यांचे निश्चिंतच आभार व्यक्त केले. शस्त्रक्रिया केल्या नंतर रुग्णालयात भिका मामा याना भेटण्यासाठी देवेंद्र देशमुख स्वतः हजर होते याप्रसंगी विकास चव्हाण , रमाकांत गलांडे, महेंद्र पाठक, नरेंद्र पुरोहित , विजय कुकरेजा, अजय धनोकार, प्रशांत धोटे, दिलीप पाटील, अविनाश वानखडे आदींची सुद्धा उपस्थिती होती. आकाश खरपाडे सारख्या समाजसेवेचे जाण असलेल्या तरुण युवकांमूळे, समाजसेवेचे व्रत समजून सहकार्य करणारे देवेंद्र देशमुख आणि यशस्वी शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर यांचे मुळे निराधार भिका मामा यांना जाऊ पाहणारी दृष्टी पुन्हा एकदा परत मिळाली.