January 1, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र राजकीय शिक्षण

देवेंद्रदादा देशमुख मित्र मंडळाकडून गरजू विद्यार्थ्यांला आर्थिक मदत

खामगाव : येथून जवळ असलेल्या जनुना बायपासवर राहणाऱ्या एका विद्यार्थ्याला देवेंद्र दादा देशमुख मित्र मंडळातर्फे त्याच्या शिक्षणासाठी मदत करण्यात आली.
येथून जवळ असलेल्या जनुना बायपासवर राहणारा महादेव बाळकृष्ण चरपे या विद्यार्थ्याला आपल्या एरोनॉटिकल इंजिनिअरिंग साठी ३१५०० रुपयांची फी कमी पडत असल्याने हा विद्यार्थी हताश झाला होता.महादेव याने आपल्या जिद्द व चिकाटीच्या जोरावर दहावी मध्ये 71 टक्के मिळवले होते तर बारावी मध्ये 69 टक्के मिळवून उत्तीर्ण झाला होता. बारावीनंतर त्याला एरोनॉटिकल इंजिनियर बनायचे होते.त्यासाठी त्याने नागपूर येथील प्रियदर्शनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे प्रवेश मिळवला होता. महादेव यांचे वडील रखवालदारी करत असून आई गृहिणी आहे.घरची परिस्थिती बिकट व हलाखीची असताना प्रथम वर्षाची फी व हॉस्टेलचा खर्च हा कुठून भरायचा याची त्याला चिंता लागली होती. अशातच त्याला नागपुर मधील एका व्यक्तीने सांगितले की तू नितीन गडकरी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधा हे तुला नक्की मदत करतील. महादेव याने तात्काळ केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याशी संपर्क साधला.नितीन गडकरी यांनी त्याला दोन वर्षाची फी व हॉस्टेल तसेच दोन वर्षाचे पुर्ण शैक्षणिक खर्च देण्याचे कबूल केले व तो खर्च दिला सुद्धा मात्र आता त्याच्या शेवटच्या वर्षात त्याला 51 हजार 300 रुपये हे भरणे गरजेचे होते.त्याने 20 हजार रुपयांची जुळवाजुळव केली होती,मात्र उरलेले ३१३०० रुपये कुठून मिळतील यासाठी तो अनेक लोकांकडे जात होता.पण त्याच्या पदरी निराशाच येत होती. खामगांव मधील एका ओळखीच्या व्यक्तिने त्याला राष्ट्रवादीचे नगरसेवक देवेंद्रदादा देशमुख यांना संपर्क करायला सांगितला व ते तुझी नक्की मदत करतील असे सुद्धा सांगितले. त्यावर महादेव याने देवेंद्र देशमुख यांचा संपर्क क्रमांक मिळवत त्यांच्याशी संपर्क साधला असता देवेंद्रदादा हे अमरावती येथे आपल्या वडिलांच्या उपचाराकरिता हॉस्पिटल मधे होते.महादेव याने देवेंद्रदादा देशमुख यांना आपली परिस्थिति सांगून मदत मागितली. त्यावेळेस देवेंद्रदादा देशमुख यांनी त्या मुलाला शब्द दिला की खामगावला आल्यावरती तुला नक्की मदत करणार व त्याच शब्दाला जाण देत देवेंद्र देशमुख यांनी तसेच मित्रमंडळींनी महादेवला ३१५०० रुपयाचा डीडी सुपूर्त केला व या वर्षाचा संपूर्ण शैक्षणिक खर्च सुद्धा ते उचलणार असल्याचे त्यांनी महादेव ला सांगितले. यावेळी देवेंद्रदादा देशमुख व मित्रमंडळ हे मदतीस धावून आल्याने महादेव च्या आईवडिलांनी व महादेव ने देवेंद्रदादा देशमुख तसेच मित्र मंडळाचे आभार मानले. यावेळी देवेंद्र देशमुख, दिलीप पाटील, अँड.विरेंद्र झाडोकार, आर्किटेक रणजीत पाटील,विजय चोपडे, गजानन अढाव,आनंद तायडे, सचिन पाठक, शेख सलीम उपस्थित होते.

Related posts

खंडणीखोर सरकारचा भाजपा तर्फे जाहीर निषेध

nirbhid swarajya

अवैध गुटखा विक्री करणाऱ्या दोन व्यवसायिकां विरुद्ध गुन्हा दाखल

nirbhid swarajya

आस्थापने उघडण्याचे परवानगीसाठी व्यापाऱ्यांचे निवेदन

nirbhid swarajya
error: Content is protected !!