मेहकर : राजकीय नेत्यांचा वाढदिवस असला कि सोहळे ठरलेले असतात परंतु पद प्रतिष्ठेची हवा डोक्यात न जाऊ देता आजही सामाजिक कार्याला महत्व देणा-या देवानंद पवार यांनी पळसखेड येथील सेवासंंकल्पवर निराधार, निराश्रीत, मनोरुग्णांच्या जेवनासाठी दिड लाख रुपये खर्च करुन २५ डायनिंग टेबलची व्यवस्था करुन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. १ जुलै रोजी रात्री सेवासंंकल्पवर जाऊन डायनिंग टेबल वर सेवासंंकल्पवरील माणसांना बसवून मिठाईचे वाटप करून मेहकर तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते देवानंद पवार यांनी आपला वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ मनिषा नितीन पवार, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा हावरे पत्रकार अमर राऊत संप्तश्रुगी महिला अर्बनच्या अध्यक्षा सौ गिताताई देवानंद पवार सेवासंकंल्पचे सेवाव्रती डॉ नंदकुमार पालवे सौ आरती पालवे श्रीराम पवार, सुलोचनाताई पवार नितीन पवार,जिल्हा परिषद अध्यक्षा यांचे स्विय सहाय्यक राजुभाऊ साखळीकर सुधिर तांदुळकर , विजय मोंढे , विष्णू वाकळे नामदेवराव राठोड घाटबोरी येथील सरपंच गजानन चनेवार मोहनसेठ जाधव भाष्कराव आडळकर गणेश पुंडे दादाराव नवलकर गजानन खेन्ते संप्तश्रुगी महिला अर्बनचेे व्यवस्थापक सुभाष खरात राजेंद्र गायकवाड मनोहर रोडगे राजेंद्र गाडे संतोष कुरकुटे गोलु भालेराव सचिन गाडे कु माधुरी पवार कु कोमल पवार यांच्या सह पवार कुटुंबिय उपस्थित होते. कधीतरी दिसतात असे चेहरे आपल्या अवती-भवती उकीरड्यावर अन्न शोधतांना वा गटारातलं पाणी पितांना.
एखाद्या मोकाट जनावरांकडे पहावं, अशी भावशून्य नजर वळते आपलीही. वाढलेल्या जटा, दाढी-मिशाचं जंजाळ व अंगभर जखमा त्यात वळवळणाऱ्या अळ्या आणि कमालीचा दुर्गंध. असा जीव एखाद्या विचित्र प्राण्यासारखा वाटतो आपल्याला. दुरुनच इतके किसळवाणं दर्शन. जवळ जाण्याचा तर प्रश्नच उरत नाही. पण या साऱ्या पलीकडे तुमच्या-आमच्यासारखा एक मानवी चेहरा लपला आहे, हे विसरतो आपण. मन विषण्ण करणारं हे चित्र बदलायला हवं. केवळ या असल्या बाबींवर चर्चा न करता कृतीतून काहीतरी करायला हवं. त्याच अनोख्या विचारातूनच एक प्रयोगशील सामाजिक कृती जन्माला आली.ती म्हणजेच, सेवासंकल्प ! रस्त्यावर पशुतुल्य जीवन जगणाऱ्या जीवांची व्यक्तीगत स्वच्छता, आरोग्याची काळजी आणि आता तर त्यांच्या भोजनाची तर व्यवस्था सामाजिक कार्यकर्ते देवानंद पवार यांच्या पुढाकाराने डायनिंग टेबलवर होऊ लागली. माणूसपण नाकारलेल्या जीवांना त्यांचा चेहरा लाभला. आजमितीस जवळपास शंभराच्या वर निराधार, निराश्रीत, मनोरुग्ण, रुग्ण व बालकं, असा सेवासंकल्प परिवाराचा गोतावळा आहे. जगानं वेडी ठरविलेली अनेक माणसं त्याच मायेच्या स्पर्शानं ध्येयवेडी झाली आहेत. सेवासंकल्प परिवाराचा कार्यकर्ता म्हणून ते समरसतेने कार्य करतात. आपल्या माणसांपासून दुरावलेल्या व रस्त्यावर वेदनादायी जीवन जगणाऱ्या अनेक जीवांना त्यांच्या कुटुंंबात पोहचतांना मिळणारा आत्मीक आनंद ही सेवासंकल्पची खरी उर्जा आहे! आजघडीला डॉ नंदकुमार पालवे सौ आरती पालवे यांच्या कार्याला देवानंद पवार सारखी अनेक माणसं हातभार लावत आहेत. “दिव्यत्वाची येथे प्रचीती… तेथे कर अमुचे जुळती.’