खामगांव : दूरदर्शनचे अकोला जिल्हा प्रतिनिधी विशालराजे बोरे यांना पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावरील प्रसारभारती व दूरदर्शनचा पुरस्कार जाहीर झाला आहे. आपल्या सुस्वभावाने संपूर्ण जिल्ह्यात ओळख असणारे प्रसार भारती व दूरदर्शन चे जिल्हा प्रतिनिधी विशालराजे बोरे यांनी पत्रकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोणाच्याही हाकेला धावून जाणारे विशालराजे बोरे सर्वांना सुपरिचित आहेत. कोणाच्या संकटकाळात विशाल बोरे यांनी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील विविध प्रेरणादायी स्टोरीज दूरदर्शनच्या माध्यमातून देशभरात प्रसारित केल्या होत्या.

जिल्ह्याला देशपातळीवरील एक वेगळी ओळख निर्माण त्यांनी करून दिली आहे. नुकत्याच त्यांना राष्ट्रीय पातळीवरील प्रसार भारती व दूरदर्शन पुरस्कार जाहीर झाला आहे.आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्याचे विविध पैलू हाताळले आहेत व अकोला जिल्ह्याचे नाव लौकिक सुद्धा केले आहे.त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. या अगोदरही विशाल बोरे यांच्या विशेष स्टोरीला हिंदी कॅटेगिरी मधून पुरस्कार सुद्धा मिळाला होता हे विशेष.. दूरदर्शनचे अकोला जिल्हा प्रतिनिधी विशाल बोरे यांचे निर्भीड स्वराज्य करून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा….