January 4, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र विदर्भ

दुचाकी वाहनाच्या धडकेत महिला ठार दोन जण जखमी

शहरातील खामगाव नांदुरा मार्गावरील बीएसएनएल कार्यालयासमोरील घटना

खामगाव: भरधाव दुचाकी वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या एका पादचारी महिलेचा खासगी रूग्णालयात मृत्यू झाला. ही घटना दिनांक ४ आँगस्ट गुरूवारी रात्री ९:३० वाजता दरम्यान घडली. यात एक मुलगा आणि दुचाकी चालक इसम गंभीर जखमी असल्याचे समजते.छाया आनंद कवठेकर (बीएसएनएल कर्मचारी वसाहत, खामगाव)असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.शहरातील नांदुरा रोडवरील बीएसएनल कार्यालयासमोरून पायी जात असताना या महिलेला दुचाकी क्रमांक एम एच २८ बि आर ३२९६या वाहनाने सायंकाळी ६ वाजता दरम्यान जोरदार धडक दिली. धडकेत गंभीर जखमी झालेल्या महिलेला खामगाव येथील खासगी रूग्णालयात भरती करण्यात आले.तेथे या महिलेची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. याप्रकरणी खासगी रूग्णालयाने शहर पोलिसांना मेमो पाठविला असून,या प्रकरणी शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भरधाव दुचाकी स्वाराने उडविल्याने हा अपघात झाल्याची चर्चा आहे.या अपघातात एक मुलगा आणि दुचाकी स्वार गंभीर जखमी झाल्या आहे

Related posts

शिवभोजन थाळी ठरली स्थलांतरीतांसाठी जगण्याचा ‘आधार’

nirbhid swarajya

बुलडाणा शहर आता सील करण्याचा निर्णय

nirbhid swarajya

शेगांवत झाली अति दुर्लभ आणि जटिल अशी शस्त्रक्रिया

nirbhid swarajya
error: Content is protected !!