खांगाव शहर पोलिसांची कारवाई
खामगाव : दुचाकीवर लिफ्ट देणाऱ्या इसमाचा मोबाईल हिसकावून पळून गेलेल्या चोरटयास शहर पोलिसांनी २५ डिसेंबर च्या रात्री अटक केली आहे.मंगेश मनोहर जोशी (५०) रा. सिव्हील लाईन यांनी एका युवकाला दुचाकीने लिफ्ट दिली होती. दरम्यान या युवकाने काँग्रेसभवन येथे आल्यावर जोशी यांना धक्का देवून त्यांच्या खिशातील मोबाईल लंपास केला होता. याप्रकरणी जोशी यांच्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी काल रात्री चोरटा रितीक रमेश इंगळे याला सुटाळा बु. येथून अटक केली. यावेळी पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा मोबाईल जप्त केला आहे.ही कारवाई शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय धीरज बांडे,पीएसआय गणेश मानेकर.पोहेकॉ प्रदीप मोठे,नापोका सागर भगत, पोका गणेश कोल्हे,अमर ठाकूर, राहुल थारकर,अंकुश गुरुदेव, रविंद्र कन्नर,राम धामोळे यांनी केली.