खामगांव : दुचाकीची टाटा पिकप ला मागून जोरदार धडक दिल्याने या धडकेत २ जण गंभीर जखमी झाल्याची घटना नांदुरा रोड वरील न्यायालयासमोर सायंकाळी ५:३० च्या दरम्यान घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदुरा रोड वरील न्यायालयासमोर टाटा पिकप उभी असताना मागून येणाऱ्या दुचाकीने टाटा पिकप वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. सदर धडकेमध्ये ओम देशमुख वय २० व प्रशांत शेटे वय १९ हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच नागरिक व शहर पोलीस घटनास्थळी जाऊन दोन्ही दुचाकीस्वारांना त्वरित सामान्य रुग्णालयात दाखल केले. यावेळी सामान्य रूग्णालयात ड्युटीवर असलेल्या डॉक्टर नितिन इंगळे यांनी अपघात झालेल्या युवकांची तपासणी न करता प्रथमोपचार करून सरळ अकोला रेफर करण्याची चिट्ठी दिली आहे.या नंतर डॉक्टर पेशंटची तपासणी करण्याचे सोडून पहिले चहा पिण्याकरीता निघून गेले. ज्यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांचा संताप अनावर झाला त्यानंतर डॉक्टरांनी येऊन उपचारास सुरुवात केली. असे प्रत्यक्षदर्शी रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले.
previous post
next post