खामगांव : आज दि.चिखली अर्बन को-ऑप बँकेकडून महिला बचत गटांना १८ लाख रूपयांचे कर्ज वाटप बँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.समाजात अबला समजल्या जाणाऱ्या मातृशक्तीला आर्थिक दृष्टीने सबला बनविण्याचे कार्य मागील 12 वर्षा पासून महिला बचतगटाच्या माध्यमातून बँकेचे अध्यक्ष श्री.सतिशजी गुप्त यांच्या नेतृत्वाखाली करीत आहे.दि.चिखली अर्बन बँकेच्या प्रगती मध्ये महिला भगिनींचा सिहाचा वाटा आहे.
https://www.facebook.com/111747353687089/posts/222742205920936/
यांचे महत्व जाणून बचत गटातिल महिला भगिनींना बचत गटाच्या माध्यमातून कर्ज देण्याची घोषणा बँकेचे अध्यक्ष श्री.सतीशजी गुप्त यांनी केली होती.सावकारी पाशात न अडकता तत्परतेने सेवा देणाऱ्या दि.चिखली अर्बन बँके सोबत सर्व माता भगिनींनी व्यवहार करावे बँक सदैव महिला भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.आज दुसऱ्यांदा बँकेकडून अत्यंत अल्प व्याज दराने ३ महिला बचत गटाच्या ६० महिलांना प्रत्येकी ३० हजारांचे वाटप करण्यात आले. हळूहळू अर्थचक्र रुळावर येत असताना महिलांव्दारे बचत गटाच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या छोट्या छोट्या व्यवसायांना कर्ज देऊन आत्मनिर्भर होण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे.
इथून पुढे हे बचत गटाच्या माध्यमातून महिलांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी चिखली अर्बन बँक अधिक गतिमान पणे कार्य करणार असल्याचे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष सतिशजी गुप्त यांनी केले.यावेळी बँकेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम दीवटे, स्थानिक सल्लागार संकल्प गुप्ता,पप्पुसेठ अग्रवाल यांच्या हस्ते कर्ज वितरण करण्यात आले .यावेळी बँकेचे शाखाधिकारी कृष्णकुमार पांडे,सुनील देशमुख, सुदेश पूरवार, नवनीत फुंडकर,दिनेश सिसोदिया,महिला बचत गट प्रतिनिधी काजल संतोष सावंग व सर्व कर्मचारी वृंद हजर होते.