विविध समस्यांच्या मागण्यांचे उपमुख्याधिकाऱ्यांना निवेदन...
खामगाव: दालफैल भागातील महिलांनी नगरपरिषदवर मोर्चा आणून विविध मागण्या व समस्यां करीता उपमुख्याधिकारी यांच्यासमोर निवेदन देऊन आपले गाऱ्हाणे मांडले .मिळलेल्या माहिती नुसार दाल फैल भागातील सार्वजनिक शौचालया मध्ये घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नागरीकांना शौचास जाणे शक्य नाही.त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे.नगरपरिषद ने नेमुन दिलेले सफाई कर्मचारी यांना नागरिकांनी वेळोवेळी सांगितले तरीसुद्धा कर्मचारी सफाईचे काम नियमितपने करीत नाही.परिसरातील नागरिकांनी कर्मचारी व नगर परिषद बद्द्ल निवेदना द्वारे रोष व्यक्त केला.दालफैल येथील सार्वजनिक शौचालयाचे सीट बदलून देण्याची मागणी सुद्धा नागरिक करीत आहेत.निवेदनात नमूद केलेल्या मागण्या-शौचालय वेळोवेळी साफ होत नाही,पाणी टँकर सुद्धा येत नाही,एकही कर्मचारी उपलब्ध नसतो,शौचालयाचे सीट बदलून देण्यात यावे, शौचालय दुरुस्ती करणे,कचरा साफसफाई करण्यात यावी,सफाई कर्मचारी बदली करण्यात यावी अशा प्रकारच्या विविध मागण्या निवेदनात नमूद केलेल्या आहेत.निवेदन द्यायला सुनिल सरदार, अमन हेलोडे,निलेश गवई,लखन हेलोडे,संजय मोटे,दिपक हिवराळे,आशिष सावंग,आनंद सरदार,नवल वाकोडे,योगेश लांडगे,मनोज इंगळे,संतोष सावंग,दिनेश लव्हाणे, विकी इंगळे,संतोष सावंग,सुमित लांडगे,अक्षय अंभोरे,दिपक लव्हाणे,यांच्यासह दाल फैल भागातील नागरिक व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.