खामगाव : शहर हद्दीतील फरशी भागात पोलीस पेट्रोलिंग ड्युटी करत असताना राकेश रामचंद्र राठोड यांनी एका इसमाला थांबवून तसेच त्यांच्या दुसऱ्या साथीदाराने मोबाईल मध्ये चित्रीकरण करताना दिसून आले. यावेळी पोलिसांनी त्यांच्या जवळ जाऊन विचारपुस केली असता त्यामध्ये दारू विक्री करताना आढळून आला. यावेळी राकेश राठोड यांनी सदर इसम सागर गायकवाड यांना विचारले असता हा माल कोणाचा आहे व कुठे घेऊन चालला त्यावेळी गायकवाड यांनी सांगितले की सदर मला हा सानंदा सेठचा आहे व तो विक्रीसाठी घेऊन जात आहे. यावेळी त्यांनी विचारले की, माल कोणत्या दुकानातून आणला ? यावेळी सागर गायकवाड यांनी सांगितले की माल हा खामगाव कंट्री या देशी दारू दुकानातून आणल्याचे सांगितले.या सर्व घटनेचा व्हिडियो काल वायरल झाला होता.
पोलिसांनी सागर गायकवाड़ याला पोलीस स्टेशनला आणले व त्याचा जवळून देशी दारुच्या १०० नग बॉटल की. २६०० रु. जप्त केल्या आहे. पोलिसांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी डिलेवरी बॉय सागर गायकवाड व देशी दारू विक्रते आंनद अशोक सानंदा यांच्या विरुद्ध ६५ ई, १८८,२६९,२७० नुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच जिल्हाधिकारी यांच्या कोविड-१९ च्या आदेशाचे उल्लंघन करुन भाजपा नगरसेवक राकेश राठोड यांनी संचारबंदी मधे विना मास्क रस्त्यावर येऊन सार्वजनिक ठिकाणी अश्लील शिविगाळ केली त्याप्रकारणी पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध १८८, २६९,२७० नुसार गुन्हा दाखल केला आहे.