November 20, 2025
जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र शिक्षण

दहावीच्या निकालाची तारीख जाहीर

मुंबई : उद्या म्हणजेच 29 जुलै रोजी दुपारी 1 वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल लागल्यानंतर आता दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे. दरवर्षी दहावीचा निकाल हा साधारण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. मात्र, यंदा करोना संकटामुळे सर्वच निकालांना उशीर झाला आहे. निकाल जाहीर झाल्यावर शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाइट mahahsscboard.maharashtra.gov.in, mahresult.nic.in वर उपलब्ध होणार आहे.
यंदा दहावीच्या परीक्षेसाठी राज्यात १७ लाख ६५ हजार ८९८विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये ९ लाख ७५ हजार ८९४ विद्यार्थी, तर ७ लाख ८९ हजार ८९८ विद्यार्थिनी आहेत. दहावीची परीक्षा ही ३ मार्च २०२० ते २३ मार्च २०२० दरम्यान घेण्यात आली. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारने दहावीचा शेवटचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. ज्याचे गुण आता इतर विषयांमध्ये मिळणाऱ्या गुणांच्या सरासरीनुसार दिले जाण्याची शक्यता आहे.

कसा पाहाल निकाल ?

– दहावीचा निकाल पाहण्यासाठी वरती दिलेल्या संकेतस्थळावर जा.
– त्यानंतर Maharashtra SSC Result 2020 रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
– त्यानंतर आपला रोल नंबर, नाव आणि आईचं नाव टाकून एंटर करा.
– Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2020 निकाल आपल्या स्क्रिनवर असेल.
– तुम्ही निकालाची प्रिंट काढू शकता.

तसंच मेसेजच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना निकाल मिळेल. त्यासाठी आसनक्रमांक नोंदवून ५७७६६ या क्रमांकावर मेसेज पाठवावा.

Related posts

केंद्र सरकारची हुकुमशाही खपवून घेतली जाणार नाही -माजी आमदार सानंदा

nirbhid swarajya

खाजगी फिजिशियन डॉक्टरांनी शासकीय कोविड रुग्णालयात सेवा देऊन सहकार्य करावे – डॉ राजेंद्र शिंगणे

nirbhid swarajya

बंद केलेल्या तेरा घंटागाड्या त्वरित सुरू करुन खामगांवकरांच्या आरोग्याशी खेळणार्यां घनकचरा व्यवस्थापन कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका अन्यथा आंदोलन…

nirbhid swarajya
error: Content is protected !!