December 29, 2024
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा

दबावाखाली येऊन इसमाची विष घेऊन आत्महत्या; तिघां विरुद्ध गुन्हा दाखल..

खामगांव : स्थानिक महाकाल चौकातील रहिवासी असलेल्या पुंडलिक जांभे यांनी कृष्णा ठाकुर यांच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना काल सकाळच्या सुमारास घडली.या घटनेमुळे परिसरात प्रचंड प्रमाणात खळबळ माजली आहे. कृष्णा ठाकुर, करण ठाकुर, जयसिंग ठाकुर यांच्या दबावाखाली ही आत्महत्या झाल्याचा आरोप जांभे कुटुंबियानी केला आहे. अश्या यांच्या तक्रारी वरून शिवाजी नगर पोलिसांनी तीन जणा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शिवाजी नगर पोलिस स्टेशनला मुलगा गणेश पुंडलिक जांभे (२०) यांनी ३१ जुलै रोजी तक्रार दिली आहे.त्यामध्ये अशा आशयाचे नमूद करण्यात आले आहे की, माझे वडील पुंडलिक तुळशीराम जांभे (५२) यांनी सिंघम वाईन बार मुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी केल्या आहेत. मात्र कोणत्याही वरिष्ठ अधिकारी यांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही.तक्रार केली तेव्हा पासून कृष्णा ठाकुर, जयसिंग ठाकुर व करण ठाकुर तिघे रा.सतिफैल यांनी माझ्या वडिलास ‘तू आमच्या विरूध्द केलेल्या तक्रारी मागे घे, नाहीतर मृतक-पुंडलिक जांभे तुला पाहून घेऊ’ अशा धमक्या वारंवार देत होते. अखेर या जाचाला कंटाळून माझ्या वडिलांनी २६ जुलै २०२० रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना प्रथम खामगाव व नंतर अकोला येथे उपचारासाठी भरती करण्यात आले. ३१ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. उपरोक्त तिघांनी माझ्या वडिलांना आत्महत्येस प्रवृत्त केले,अशी तक्रार त्यांच्या मुलाने दिली आहे. पुंडलिक जांभे यांच्या मृत्यु झाल्याने महाकाल चौक परिसरात काही तास तणावाचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे शिवाजीनगर पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला होता.त्यांचा मुलगा गणेश पुंडलिक जांभे याच्या फिर्यादिवरुन पोलिसांनी कृष्णा ठाकुर, जयसिंग ठाकुर व करण ठाकुर यांच्या वर भादवी कलम 306,34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या आत्महत्येमुळे परिसरात प्रचंड खळबळ माजली असून सदरचा वाईन बार त्वरित बंद करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. मात्र राजकीय दबावापोटी पोलिस कुठलीही कारवाई करत नाही असाही आरोप नातेवाईकांकडून होत आहे.सर्वप्रथम वाईन बार चालकांवर कारवाई करण्यात यावी व कृष्णा ठाकुर, जयसिंग ठाकुर, करण ठाकुर यांना तात्काळ अटक करावी त्यानंतरच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येईल अशी ठाम भुमिका जांभे कुटुंबियानी घेतला होता, मात्र पोलिसांच्या आश्वासनामुळे पुंडलिक जांभे यांच्यावर रात्री उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आला होता.

Related posts

जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये महापरिनिर्वान दिना निमीत्त घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेकर यांना अभिवादन…

nirbhid swarajya

शहरात चौकाचौकात मोकाट जनावरांचा हैदोस

nirbhid swarajya

आमदार जितेंद्र आव्हाडांना अटक….

nirbhid swarajya
error: Content is protected !!