वसंत ऋतुची चाहूल
लागताच नजरेला भुरळ घालणारा
पळस सध्या लाल गडद झाला आहे.’फ्लेम ऑफ द फायर’ असे पळसफुलांचे नामकरण इंग्रजांनी केले
आहे कारण पानगळीनंतर आलेल्या लाल रंगाच्या फुलांना ज्वाला सारखा आकार असतो संपुर्ण झाड पेटल्या सारखे दिसते.
पळस सध्या सातपुड्याच्या
रानमाळावर बहरला आहे यामुळे रानांत आतापासूनच
रंगोत्सवाला सुरुवात झाली आहे.हिंदू संस्कृती मधील होळी सना निमित्त पळस फुलां पासून रंगाची
उधळण केली जाते. हा पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. वसंत ऋतुच्या पुनरागमनाने अनेक रंगाच्या फुलाने फुललेल्या पळस हे वृक्ष ही बहरून जातं.
पळसाच्या फुलांचा पूर्वी रंग करण्यास वापर होत असे. कृत्रिम रासायनिक रंगामुळे ही पद्धत मागे पडली आहे. याच्या बिया फार कडू असतात. त्यास पळसपापडी म्हणतात. त्याचा औषधी उपयोग आहे.
previous post