बुलडाणा:- 1 जानेवारी रोजी अवैद्य अग्रवाल फटाका केंद्राचे गोडाऊन सील करताना खामगाव येथील सांज दैनिक लोकोपचार पत्रकार शिवाजी भोसले वृत्तसंकलन करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर आरोपींनी हल्ला चढवून त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला याप्रकरणी पत्रकार भोसले यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे तक्रार सुद्धा दाखल केली होती या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त तिघांविरुद्ध कलम 392 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र जिल्हाभरातील पत्रकार संघटनांनी मागणी केली होती की पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत यामध्ये गुन्हा दाखल करण्यात यावा यावरून पोलिसांनी सदर तिघा आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे तर पोलिसांनी आरोपी गब्बू गुजरीवाला याला अटक करत उर्वरित दोन आरोपींना फरार घोषित केले होते संबंधित घटनेला चार ते पाच दिवस उलटूनही दोन फरार आरोपींना अद्यापही अटक करण्यात आली नसून कुठेतरी पोलिसांकडून या आरोपींना अभय मिळत असल्याचे बोलल्या जात आहे आज 6 जानेवारी पत्रकारदिनी खामगाव उपविभागीय अधिकारी यांना खामगाव पत्रकारांनी निवेदन देऊन मागणी केली आहे की या फरार आरोपींना तात्काळ अटक करा आरोपी शहरात मोकाट फिरत आहे अन्यथा आम्हाला उपोषणाचा मार्ग पत्करावा लागेल अशा मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी खामगाव यांना देण्यात आले आहे