खामगाव: अनैतिक संबंधातील पठाणी ‘वसुली’ जिव्हारी लागल्यानेच एका २३ वर्षीय युवकाने गळफास घेऊन जीव दिल्याची वस्तुस्थिती आता उघड झाली आहे. त्यामुळे पोलीसांनी खामगावातील अनैतिक संबधातून वसुली करणाऱ्या त्या बालेवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करण्यासाठी सुरूवातीला टाळाटाळ करण्या ‘मनमौज’ तपास अधिकाऱ्याला ‘खुंट्या’ला बांधून ठेवत पोलिस प्रशासनाने दुसऱ्या अधिकाऱ्यांमार्फत गुन्हा दाखल केला.भंडारी येथील आदिनाथ गडेकर या २३ वर्षीय युवकाने खामगावात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी त्याचे वडील विनायक गडकर (५८) यांनी शिवाजी नगर पोलिसांत तक्रार दिली. यामध्ये आपल्या मुलाचे खामगाव येथील एका महिलेशी अनैतिक संबध होते. या संबंधातून महिलेकडून वारंवार युवकाला पैशांची मागणी केली जायची. तिला वारंवार पैसे दिल्यानंतरही तीच्या सततच्या छळाला आणि ब्लॅकमेलींगला कंटाळून आपल्या मुलाने आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमूद केले. या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलीसांनी आरोपी महिला वनिता चौकसे रा. फक्कड देवी मंदिरा मागे हिच्या विरोधात भादंवि कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला.
आँनलाइन व्यवहार
-ब्लॅकमेलींग प्रकरणी संबंधित महिलेकडून आँनलाइन व्यवहार करण्यात आल्याचेही उघड होत आहे. त्याचवेळी युवकाने आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित महिलेला फोन केला. त्याचवेळी लाइव्ह फोन केल्याचे तपासात उघड झाले.