November 20, 2025
बुलडाणा

“त्या” कोरोना संशयित रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह,कोरोनामुळे मुत्यु झाला नाही…

बुलडाणा: येथे काल कोरोना संशयित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती मात्र या रुग्णाचे नमुने घेऊन नागपूरला पाठविण्यात आले होते त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याने या रुग्णाचा मृत्यू हा कोरोना व्हायरस मुळे झाला नसल्याचे सिद्ध झाले आहे.

सौदी अरब मधून परत आलेल्या ७० वर्षीय रुग्णावर बुलडाणा सामान्य रुग्णालयातील कोरोना व्हायरस नियंत्रण कक्षात उपचार सुरू करण्यात आले असतांना या रुग्णाचे नमुने नागपूर येथे पाठवण्यात आले होते, सोबतच या रुग्णाला इतरही मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारखे आजार जडले होते मात्र उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाल्याने त्याचा मृत्यू कोरोना मुळे तर झाला नसावा या अफवेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती , मात्र आज या रुग्णाचा रिपोर्ट प्राप्त झाला असून कोरोना मुळे हा मृत्यू झाला नसल्याचे सिद्ध झाले आहे , त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही मात्र सतर्क राहून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि स्वछता राखावी असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

Related posts

शासनाच्या एचआयव्ही निर्मूलनासाठी राबवलेल्या पीपीटीसीटी कार्यक्रमाचे सुयश…जिल्ह्यात नवजात बालकात एचआयव्ही चे प्रमाण शून्य.

nirbhid swarajya

प्रेमाला घरच्यांचा विरोध असल्याने प्रेमीयुगुलाने केली आत्महत्या

nirbhid swarajya

अल्पवयीन पुतणी वर काकाने केलं दुष्कर्म

nirbhid swarajya
error: Content is protected !!