निर्भिड स्वराज्य टिम (बुलडाणा) : बुलडाणा येथे रविवार २९ मार्च रोजी एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता, त्या मृत व्यक्तीचे स्वॅब नमुन्यांचा नागपूर येथून कोरोना पाॅझिटिव्ह अहवाल आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासनाने त्या कुटुंबासह परिसरातील ६० व्यक्तींना तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात आणले. पहिल्या दिवशी रात्री ६० पैकी २४ तर दुसर्या दिवशी सकाळी पुन्हा आठ नमुने तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात आले, त्या एकूण ३२ नमुन्यांपैकी सोमवार ३० मार्च रोजी सायंकाळी २० नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले होते.
ही दिलासादायक बातमी असतानाच आज मंगळवार ३१ मार्च रोजी सकाळी पुन्हा त्यातली ३ नमुन्यांचे अहवाल आले असून बुलडाणा वासीयांची चिंता वाढविण्याची बातमी समोर आली आहे. ‘त्या’ कोरोना पाॅझिटिव्ह मृतकाच्या परिवरातीलच आणखी २ जणांचे कोरोना पाॅझिटिव्ह अहवाल आल्याची माहिती व यामध्ये ६५ वर्षीय वृद्ध आणि १३ वर्षीय मुलीचा समावेश आहे अशी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रेमचंद पंडित यांनी दिली आहे. तर अजून ९ नमुन्यांचे अहवाल येणे बाकी आहे.
शनिवारी २९ मार्च रोजी एका ४५ वर्षीय रुग्णाचा जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना कक्ष आयसोलेशन कक्षात सकाळी मृत्यू झाला होता. त्यानंतर रविवारी २९ मार्च रोजी नागपूरहून त्या रुग्णाचा कोरोना पॉझेटीव्ह म्हणून अहवाल आला आणि जिल्हा प्रशासन सतर्क होवून महत्वाचे निर्णय घेत संपूर्ण बुलडाणा शहराला लॉकडाऊन करून कोरोना पॉझेटीव्ह रुग्ण राहणाऱ्या परिसराला रेड झोन मध्ये घेवून कोरोना पॉझेटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील पहिल्या दिवशी रात्री ६० पैकी २४ तर दुसर्या दिवशी सकाळी पुन्हा आठ नमुने तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात आले, त्या एकूण ३२ नमुन्यांपैकी सोमवार ३० मार्च रोजी सायंकाळी २० नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. आज मंगळवार ३१ मार्च रोजी सकाळी पुन्हा त्यातली ३ नमुन्यांचे अहवाल आले असून ‘त्या’ कोरोना पाॅझिटिव्ह मृतकाच्या परिवरातीलच आणखी २ जणांचे कोरोना पाॅझिटिव्ह आले आहे. मृतक आणि कोरोना पाॅझिटिव्ह आलेल्या जणांचा परिसर पूर्ण पणे बंद करण्यात आला असून नगर परिषदेच्या साहाय्याने रेड जोनच्या परिसरात ४० आरोग्याचे पथक स्थापन करून परिसरातील रहिवासी यांची चौकशी करीत आहे.