मलकापूरचे नगराध्यक्ष अॅड.रावळ यांच्यावर अखेर विविध गुन्हे दाखल
मलकापूर : मलकापूरचे नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ यांनी बुलडाणा येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आयसोलेशान कक्षात भरती असताना तिथल्या समस्या संदर्भात व्हिडिओ काढून सोशल माध्यमांवर शेअर केला होता.तो व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा ,साथरोग नियंत्रण कायदा आणि आय टी अॅक्ट नुसार विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे.अशा प्रकारच्या कोणत्याही असुविधा आयसोलेशन कक्षात व त्या रुग्णालयात नव्हत्या, त्यामुळे स्वतःच्या प्रसिद्धी साठी आणि शासनाची बदनामी केली असा दावा नंतर जिल्हा प्रशासनाने केला होता. याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदरचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.