November 20, 2025
बातम्या

‘तेंव्हाही’ रेल्वे बंद नव्हती..रेल्वेची भारतीयांना कळकळीची विनंती

सोशल मीडिया अपडेट : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतातील नागरिक लॉकडाउनच्या सरकारी निर्णयाला गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी ‘जनता कर्फ्यू’चे पालन करण्याचे आवाहन भारतीय नागरिकांना केलं होतं. त्यादिवशी संध्याकाळी पाच वाजता करोनाविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर आणि नर्सेसबरोबरच अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी मोदींनी बाल्कनीमधून टाळ्या किंवा थाळ्या वाजवण्यास सांगितले होते. मात्र गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशबरोबर इतर अनेक राज्यांमध्ये लोक संध्याकाळी पाच वाजता मोठ्या संख्येने एकत्र येऊन थाळ्या, घंटा वाजवून शंखनाद करताना दिसले. मुंबईतही काही ठिकाणी हे चित्र दिसलं.  त्यानंतर सोमवारी देशातील ज्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन करण्यात आलं आहे तिथे बाजारांमध्ये लोक मोठ्या संख्येने दिसून आली. त्यामुळे लोकांनी गर्दी करु नये म्हणून लॉकडाउन करण्याचा सरकारचा मूळ हेतूच फसल्याचे चित्र दिसत होते. असेच काही रेल्वेबद्दल सुध्दा झालेले आहे.

भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये लोक लॉकडाउनला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. लॉकडाउनच्या काळात अनेकजण कारण नसताना बाहेर फिरताना दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी सरकारने ट्रेनने प्रवास करु नका असं आवाहन सरकारने केलं असतानाच अनेक रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून आली. आपल्या गावी जाण्यासाठी हजारो लोक रेल्वेने प्रवास करत होते. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आहात त्याच शहरामध्ये थांबा असं आवाहन केलं. मात्र त्याचाही फारसा परिणाम झाला नाही. अखेर २२ मार्च रोजी सरकारने रेल्वे पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र सरकारकडून अनेक महत्वाचे निर्णय घेतले जात असतानाही लोकं लॉकडाउनचे गांभीर्याने घेतानाचे चित्र दिसत नाहीय. म्हणूनच रेल्वेने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेण्याचे आवाहान भारतीय नागरिकांना केलं आहे. यासाठी त्यांनी रेल्वेचेच उदाहरण दिले आहे.

रात्री सव्वाबारा वाजता रेल्वेच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आलेल्या ट्विटमध्ये, “भारतीय रेल्वे युद्धाच्या काळातही कधी थांबली नव्हती. कृपा करुन परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्या आणि घरीच थांबा,” असं म्हटलं आहे.

भारतीय रेल कभी युद्धकाल में भी नहीं रुकी
कृपया परिस्थितियों की गम्भीरता समझिए
घर में ही रहिये।

— Ministry of Railways

भारतीय रेल्वेने ट्विट करण्याआधी कालपासूनच सोशल नेटवर्किंगवर अशाच प्रकारचे मेसेजे व्हायरल झाल्याचेही पहायला मिळालं. बॉम्बस्फोट, पाऊस, दंगल यामध्येही कधी न थांबणारी मुंबईची लाइफलाइन म्हणजेच लोकल सेवा थांबवण्यात आली आहे त्यावर आपण परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन घरीच बसलं पाहिजे असं आवाहन करणाऱ्या काही पोस्ट सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्या आहेत.

Related posts

ज्ञानगंगा प्रकल्प 100 टक्के भरला; 36 गावांना सतर्कतेचा इशारा

nirbhid swarajya

आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत तथा साहित्यीक मा.प्रविणजी पहूरकर यांचा सत्कार व व्याख्यान…

nirbhid swarajya

Now, More Than Ever, You Need To Find A Good Travel Agent

admin
error: Content is protected !!