April 19, 2025
खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र विदर्भ शेतकरी

तुरीचा हंगाम धोक्यात? तुरीवर शेंगा व फुल पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव…

खरीप तुरीचा हंगाम धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.कारण सध्या तुरीवर मोठ्या प्रमाणात शेंगा व फुले पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होत आहे.तूर उत्पादक पट्ट्यामध्ये जवळपास तुरीचे पीक या किडीच्या प्रादुर्भावामुळे सध्या बाधित झाले आहे.मात्र, याही परिस्थितीत शेतकऱ्यांनी घाबरून न जाण्याचा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दिला आहे. तूर उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण तुरीवर मोठ्या प्रमाणावर शेंगा व फुले पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. मोठ्या क्षेत्रावरील तुरीचं पीक या किडीच्या प्रादुर्भावामुळे बाधित झाले आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर तुरीचे क्षेत्र आहे.तुरीचे हे क्षेत्र अळीच्या प्रादुर्भावामुळे बाधित झाले आहे. आणखी क्षेत्र बाधित होण्याचा धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत आहेत.जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक हे सोयाबीन आहे.त्यानंतर प्रमुख पीक म्हणून तुरीकडे बघितले जाते.आधीच अतिवृष्टीमुळे सोयाबीन आणि कापूस पिकाच मोठं नुकसान झालं आहे.परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या हाती आलेली पीक वाया गेली आहेत.त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.यातून उरली सुरली पीकसुद्धा आता वाया जाण्याच्या मार्गावर आहेत.राज्यात सध्या थंडीचा कडाका वाढला आहे.थंडीचा जोर वाढल्यामुळे तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे बोलले जात आहे.शेंगा पोखणाऱ्या अळीमध्ये तीन प्रकारच्या अळी असतात, यामध्ये शेंगा पोखरणारी अळी,पिसाळी पतंग आणि शेंग अळी या तीन प्रकारच्या किडीचा प्रादुर्भाव तुर पिकावर झाला आहे.बुलढाणा जिल्ह्यात तूर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. तर त्यामुळं जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहे. या अळीमुळे तुरीच्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे.तुरीच उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी घाबरून न जाण्याचा सल्ला अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दिला आहे. तसेच शेंगा पोखरणाऱ्या अळीपासून पिकाचं कसं संरक्षण करावं यासाठीचा सल्लाही डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं शेतकऱ्यांना दिला आहे.या किडीचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी जैविक आणि रासायनिक खतांच्या फवारण्या आवश्यक आहेत. शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाने दिलेल्या सुचनांचे पालन करणे गरजेचे आहे. याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे.

Related posts

Financial Firm TD Ameritrade Launches Chatbot For Facebook

admin

MacBook Pro Squeezes Fans As iPad Pro Dominates

admin

जिल्ह्यात संचारबंदी कालावधीत आणखी दुकाने उघडण्यास परवानगी

nirbhid swarajya
error: Content is protected !!