December 29, 2024
आरोग्य चिखली जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय विदर्भ शेतकरी

तिबार पेरणी च्या संकटाने शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

चिखली तालुक्यातील कारखेड येथील घटना…

शेषराव मंजुळकार आणि जनाबाई मंजुळकार यांनी केली आत्‍महत्‍या…

चिखली : आर्थिक अडचण आणि दुबार, तिबार पेरणी करूनही पावसा अभावी पीक उगवले नाही, म्हणून आर्थिक संकट ओढवलेल्या शेतकरी दाम्पत्याने विषारी औषध घेऊन आपले जीवन संपविल्याची घटना चिखली तालुक्यातील कारखेड येथे घडलीय. या घटनेने संपुर्ण जिल्हा हादरला आहे. शेतकर्यांच्या पत्‍नीचा ८ जुलैच्‍या रात्री तर पतीचा ९ जुलैच्‍या सकाळी मृत्‍यू झालाय. या शेतकरी दाम्पत्याने ७ जुलैला रात्री आपल्या राहत्या घरी विष घेतले होते. त्यानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भर्ती केले होते. ६० वर्षीय शेषराव मंजुळकार आणि ५१ वर्षीय जनाबाई मंजुळकार अशी आत्‍महत्‍या केलेल्या दाम्‍पत्‍याची नावे आहेत.

त्यांच्याकडे दोन एकर शेती असून यावर्षी पाऊस पडल्यावर त्यांनी पेरणी केली मात्र बियाणे उगवलेच नाही, त्यामुळे त्यांनी शेतात दुसऱ्यांदा पेरणी केली, मात्र ते उगवलेले असताना ही पावसाअभावी पीक करपून गेलंय. आणि आता तिसऱ्यांदा पेरणी करायची तर त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले. दोन्ही वेळा पेरणी केली तर जवळचे पैसे खर्च झाले आणि तिसऱ्यांदा पेरणी कशी करायची या विवंचनेत असल्याने दोघांनी विष घेतले होते. त्‍यांच्‍यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झालाय. या कुटुंबाकडे दोन एकर शेती असून, त्यांना दोन मुले तसेच चार मुली आहेत. या सर्वांची लग्न झालेली आहेत. मंजुळकार दाम्पत्य हे त्यांच्या शेतीसोबतच परिसरात दगड फोडणे आणि मजुरी करणे हा त्यांचा व्यवसाय होता. यावरच त्यांचा प्रपंच चालायचा. शिवाय पत्नी जनाबाई याना अर्धांगवायू आजार झालेला होता.या सर्व प्रकारामुळे दोघेही चिंताग्रस्त होते.

Related posts

आठ वर्षीय चिमुकली.. कोरोनावर भारी…!

nirbhid swarajya

ज्ञानगंगापूर येथे शालेय विद्यार्थीनीच्या वाढदिवसा निमित्त केले वृक्षारोपण…

nirbhid swarajya

आम्ही रुग्णसेवक ग्रुप व पळशी बू गावकरी मंडळी महात्मा फुले जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे

nirbhid swarajya
error: Content is protected !!