शेगांव : तालुक्यातील परिसरात गेल्या काही दिवसांत पाऊस पडल्याने बळीराजा शेतीच्या कामात गुंतला असून चोहीकडे पेरणी ची लगबग सुरु झाली आहे . परिसरात यावर्षी कपाशी व तूर पिकाचा पेरा वाढला असून शेतकऱ्यांचा कल कपाशी तूर पिकाकडे वळला आहे . या आठवड्यात परिसरात दोन तिन वेळा पाऊस पडल्याने पेरण्या सुरू झाल्या आहेत . एकीकडे परत एकदा कोरोना सारखी भयावह परिस्थिती निर्माण झाली असतांना जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा या परिस्थितीत सुद्धा आपला जीव मुठीत धरून योगदान देत आहे . परिसरात आलेल्या वादळी वाऱ्याच्या सोसाट्याच्या वाऱ्याने व पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडवली होती .