January 4, 2025
अकोला खामगाव जळगांव जामोद जिल्हा नांदुरा बुलडाणा मलकापूर महाराष्ट्र मेहकर विदर्भ शेगांव संग्रामपूर

तालुकास्तरीय महाआवास अभियान पुरस्कारांचे वितरण ग्रामपंचायत लासुरा खुर्द ला मिळाला प्रथम पुरस्कार

शेगाव:- पंचायत समितीच्या वतीने महाआवास अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींचा तालुकास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व आझादीच्या अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम प्रशासक तथा गटविकास अधिकारी सतिष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता . सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार डॉ . संजय कुटे तर प्रमुख पाहूणे तहसीलदार समाधान सोनवने , गटविकास अधिकारी सतिष देशमुख , सहा . गटविकास अधिकारी बी . डब्ल्यु चव्हाण , गटशिक्षणाधिकारी श्रध्दा वायदंडे , सीडीपीओ श्रीमती वैशाली घनोकार , आदि मान्यवर उपस्थित होते . प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत प्रथम पुरस्कार ग्रामपंचायत लासुरा खुर्द , व्दितीय पुरस्कार ग्रामपंचायत हिंगणा वैजनाथ , तृतिय पुरस्कार ग्रामपंचायत भोनगाव तर रमाई आवास योजनेच प्रथम पुरस्कार ग्रामपंचायत जानोरी , व्दितीय पुरस्कार ग्रामपंचायत टाकळी विरो , तृतिय पुरस्कार ग्रामपंचायत कालखंड यांना देण्यात आला . तसेच प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत उत्कृष्ट बांधकाम केलेल्यामध्ये लाभार्थी प्रथम पुरस्कार श्रीमती मनोरमाबाई हरीभाऊ कोकाटे वरुड , व्दितीय पुरस्कार श्रीमती अंजनाबाई पुंडलीक कराळे नागझरी ततिय पुरस्कार प्रदिप सुखदेव जवंजाळ लासुरा तर रमाई आवास योजना अंतर्गत लाभार्थी प्रथम पुरस्कार दिपक दादाराव विरघट शिरसगाव निळे , व्दितीय पुरस्कार पदमाकर वासुदेव चिम खेडां , तृतिय पुरस्कार संतोष महादेव खंडेराव कालखेड यांना आ . डॉ . संजय कुटे व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला आहे . तसेच आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत देशभक्ती पर सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आले . सदर कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने जि.प. शाळा / खाजगी शाळा व शिक्षक कर्मचारी / कार्यालयीन कर्मचारी यांनी विविध कार्यक्रमात उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला . कार्यक्रमात सहभाग नोंदविलेल्या सर्वांना त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणा करीता प्रशस्तीपत्र तसेच सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती मीनाक्षी कुवारे व संजय सुरळकर यांनी केले

 

Related posts

रान डुक्करांचा हैदोस,कपाशी लागवडीचे नुकसान

nirbhid swarajya

शेतकरी नेते राकेश टिकैत शनिवारी अकोल्यात

nirbhid swarajya

कोरोना चाचणी करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आव्हान

nirbhid swarajya
error: Content is protected !!