January 4, 2025
अमरावती खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र मुंबई विदर्भ सामाजिक

तापमानाला रोखण्यासाठी झाडे लावण्याची गरज: हवामान अभ्यासक पंजाबराव डख

खामगाव: तापमान वाढल्याने पाऊसही वाढला म्हणून पुढील काळात दुष्काळ पडणार नाही असे प्रतिपादन हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी २० मार्च रोजी तुकाराम महाराज बीज निमित्त बोरी अडगाव येथे पुरुषोत्तम मेतकर व शिवशक्ती- भीमशक्ती मित्र मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना केले.अवकाळी पाऊस वाढणार त्यामुळे झाडांची लागवड करावी लागणार आहे. झाडामुळे रिमझिम पाऊस पडतो यासाठी भविष्यकाळात प्रत्येक व्यक्तीने पृथ्वीचे तापमान कमी करण्यासाठी झाडे लावून त्याचे संगोपन करावे त्या अगोदर पुरुषोत्तम मेतकर व शिवशक्ती-भीमशक्ती मित्र मंडळाच्या वतीने पंजाबराव डख यांचा शाल श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला.पुढे बोलताना हवामान तज्ञ डख म्हणाले की हवामानाचा अंदाज शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी अनेक संस्था आहेत परंतु त्यांचा अंदाज खरा ठरताना दिसत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते परंतु मी गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाचा व हवामानचा अभ्यास केला.त्यामुळे अचूक अंदाज सांगतो या अगोदर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नव्हता परंतु आता फेसबुक व्हाट्सअप ट्विटर च्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे. यापुढे शेतकऱ्यांना हवामान संबंधी दिलेल्या सूचनेनुसार सध्या हवामानामध्ये प्रचंड बदल होत असल्याने आता पारंपरिक पिके येत नसल्याने यापुढे तसे न करता त्यांनी सध्याच्या बदलत्या हवामान अंदाजानुसार पुढील काळात शेतकऱ्यांनी काम केले तर बळीराजा चा कांदा सोयाबीन तूर गहू सहा इतर सर्व पीक यापुढे वाया जाऊ देणार नाही अशी ग्वाही यावेळी दिली. शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटाने नेहमीच बळीराजा बेजार असतो त्यामुळे मी शेतकरी पुत्र असल्याने अशा संकटकाळी मदत करण्याचे व्रत घेतले असल्याने निस्वार्थ मदत करण्याचे काम करतो राज्या मधील सर्व गावांमध्ये जाऊन निसर्ग आणि शेती बद्दल जनजागृती करून त्यांना यासंबंधी माहिती देणार आहे. लॉकडॉन च्या काळामध्ये देशातील अनेक कंपन्या बंद पडल्या परंतु शेतीत टाकलेला पैसा वसुली होत नाही तरीसुद्धा माझ्या बळीराजाची एकमेव शेती नावाची कंपनी सुरु होती यापुढे कोणतेही संकट आल्यास चालू राहणार आहे.असे बोलताना सांगितले.यावेळी खरेदी-विक्री संस्थेचे माजी अध्यक्ष बाबुराव लोखंडकार,मा उपसभापती तुषार गावंडे,नयदेवी सरपंच शामसुंदर पाटेखेडे,लाखनवाडा उपसरपंच प्रकाश इंगळे,डॉ सतीश खडसे,सुबन उला खान,शिराळा उपसरपंच संतोष हटकर, प्रकाश बारगळ,बाळू हागारे ,मनोहरा अरज, सदाशिव राऊत,संजय उपासे, देविदास चव्हाण, तेजराव टीकार पाटील, सदानंद वाघमारे, पत्रकार सुधीर पाटील,राहुल सुरवाडे,चंद्रकांत टेरे,भागवत ठाकरे,रघुनाथ खंडारे, व परिसरातील असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.

Related posts

जळगाव जामोद – नांदुरा मार्ग वाहतुकीसाठी बंद

nirbhid swarajya

शेती व बांधकाम साहित्याची दुकाने सकाळी ७ ते सायं ७ वाजेपर्यंत सुरू राहणार

nirbhid swarajya

बंद केलेल्या तेरा घंटागाड्या त्वरित सुरू करुन खामगांवकरांच्या आरोग्याशी खेळणार्यां घनकचरा व्यवस्थापन कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका अन्यथा आंदोलन…

nirbhid swarajya
error: Content is protected !!