बुलडाणा : जिल्ह्यातील शेगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात बलात्कार व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल असलेला आरोपी बुलडाण्याच्या ग्रामसेवक प्रशिक्षण प्रबोधनी येथील तात्पुरत्या कारागृहात कोरोनामूळे विलगीकरणासाठी ठेवण्यात आला होता. मात्र सदर आरोपीने काल पहाटे ५:४५ च्या सुमारास शौचालयाचे लोखंडी गज तोडून फरार झाल्याची घटना काल पहाटे उघडकीस आली होती. या घटनेनंतर जिल्ह्यातील गृह विभागात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, आरोपी विनोद शामराव वानखेडे रा.मांडोली पो.पान्हेरी ता. बाळापूर जि.अकोला याच्याविरुद्ध जिल्ह्यातील शेगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात बलात्कार व पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल आहे. आरोपीला कारागृह कोठडी मिळाल्याने त्याला बुलडाणा कारागृहात आणले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुलडाण्याच्या ग्रामसेवक प्रशिक्षण प्रबोधनी या सिंहगड इमारत अर्थात तात्पुरत्या कारागृहात १४ दिवस विलगीकरणासाठी ठेवण्यात आले होते. मात्र काल पहाटे ५:४५ वाजताच्या सुमारास आरोपी शौचालयात गेला व त्याने लोखंडी गज तोडून पोबारा केला होता. व्ही. ना. राऊत बुलडाणा कारागृह अधिक्षक कार्यालया तर्फे देण्यात आल्याने फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात कलम २२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी शहर ठाणेदार प्रदीप साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. शरद सावळे पुढील तपास करीत होते. काल पोलिसांनी आपली जिल्ह्यातील सर्व तपास यंत्रणा या आरोपीला शोधण्यासाठी लावली असता खामगाव मधील शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत सदर आरोपी आपल्या नातेवाईकांच्या घरी लपलेला असल्याचे शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठानेदार सुनील हुड यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे शिवाजीनगर पोलिसांनी बलात्कारातील फरार आरोपीला त्याच्या नातेवाईकांच्या घरातून ताब्यात घेतली आहे. सदरची कारवाई शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील हुड यांच्या मार्गदर्शनाखाली पो ना देवेंद्र शेळके,पो ना संदीप टाकसाळ, पो ना अरविंद बडगे, पो का रवींद्र कन्नर यांनी सदर आरोपीस पकडून बुलढाणा शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.