खामगाव : खामगाव येथील पंचायत समितीचे बाजूला असलेल्या रस्त्यावरील अतिक्रमण त्वरित हटविण्यात यावे असे पत्र तहसीलदार शितल रसाळ यांनी नगर परिषद मुख्याधिकारी बोरीकर यांना दिले आहे. दिलेल्या पत्रात असे नमूद आहे की येथील पंचायत समिती व केला हिंदी हायस्कूल शाळा मध्ये रस्ता असून सदर रस्त्यालगत अनेकांनी अतिक्रमण करून टपऱ्या टाकलेल्या आहेत त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालय उप अधीक्षक कार्यालय उपविभागीय कार्यालय तहसील कार्यालय येथे ये-जा करणार्या नागरिकांना त्रास होतो याबाबत अनेक तोंडी तक्रारी आलेल्या आहेत तसेच न्यायाधीश दिवाणी न्यायालय खामगाव यांचे निवासस्थानी सुद्धा येथेच असल्याने त्यांच्या येण्याजाण्याचा हा रस्ता आहे. त्याचप्रमाणे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे निवासस्थान सुद्धा या भागातच आहे त्यामुळे सदर रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात यावे तसेच या ठिकाणी पार्किंग झोन तयार करण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
previous post