December 29, 2024
खामगाव जळगांव जामोद जिल्हा नांदुरा बातम्या बुलडाणा शेगांव शेतकरी संग्रामपूर

तहसिलदारा यानी हातात तिफन घेत तलाठी,मंडळधिकारीसह केली शेतात जाऊन पेरणी…!

संग्रामपूर :- सध्या तालुक्यासह ठिकठिकाणी मान्सुनच चांगल आगमन सुरू असून शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला आहे. पण शेतकरीच नाही तर खुद्द तहसिलदार देखील पेरणीला लागले आहेत. एका शेतात जाऊन शेतकऱ्यांना पेरणी करण्याच्या कामात मदत केली आहे. शासकीय वाहन रस्त्याकडे लावून शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांनी पेरणी करणाऱ्या बैल जोडीची तिफन हातात घेत पेरणी केली.संग्रामपूर तालुक्यात बहुतांश भागात मान्सून दाखल झाल्यानं शेतकरी पेरणीच्या तयारीला लागलेत. ज्या ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झालाय तिथं पेरणीची लगबग सुरू आहे. तालुक्यात शेतकर्यांनी पेरणीला सुरुवात केली. अशातच तहसिलदार थेट शेतात पोहचल्य़ा अन तलाठी, मंडळ अधिकारी राऊत यांना सोबत घेत स्वतः तिफन चालवला. संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी गावाजळील नायसे ह्या शेतकऱ्याच्या शेतात तहसिलदार सिध्देश्व़र वरणगावकर यांनी तिफन धरत पेरणी केली. पळशी झाशी येथे शासकीय कामानिमित्त़ गेले असता परत येत असतांना गावातील शेतकरी शेतात पेरण करत असल्याचे पाहून आपली शासकीय गाडी रस्त्याच्या कडेला लावून तहसिलदार वरणगावकर यांनी थेट शेतात मंडळधिकरी जी.आर. राऊत, तलाठी डी.एस. जाधव ,सरपंच अभयसिह मारोडे यांना सोबत घेत तिफन हाती घेतले अन बैलजोडी हाकलत पेरणीला सुरुवात केली.थेट तहसिदारांनी शेतात तिफन धरल्याचे बघून परिसरातील शेतकऱ्यांना आचशर्य व्यक्त केले. तहसिलदार यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.स्वतः तिफन हाकलत पेरणीत सहभाग नोंदवुन शेतकऱ्‍यांचा उत्साह वाढवुन देण्याचा प्रयत्न केला , तहसिलदार वरणगावकर यांनी पळशी शिवारातील नायसे यांच्या शेतात जाऊन पेरणीच्या कामात सहभाग घेतला व स्वतः तिफन हाकलली . ह्यावेळी उपस्थित सर्व पेरणी करणाऱ्यानी तहसीलदार यांचे कौतुक केले

Related posts

जलंब येथे आरोग्य शिबीराचे आयोजन

nirbhid swarajya

जळगाव जामोद-मार्ग वाहतुकिसाठी सुरू….

nirbhid swarajya

मुलगी वाचली पण आई गेली…

nirbhid swarajya
error: Content is protected !!