मलकापुर ( हनुमान भगत): तालुक्यातील लोणवाडी येथील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेला २३ वर्षीय तरुणाचा मृतदेह लोणवडी शिवारातील शेत तलावात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लोणवाडी येथील निलेश शिवाजी बावस्कार वय २३ हा तरुण ३दिवसांपासून हरविला होता. त्यासंदर्भात ची तक्रार घरच्यांनी मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली होती. दरम्यान सहा जून रोजी सायंकाळी गावातील सौरभ विलास बावस्कार यांना गावात असलेल्या शेत तलावात निलेश शिवाजी बावस्कर याचा मृतदेह असल्याचे आढळून आले.
त्याने ही माहिती कृष्णा एकनाथ बावस्कार यांना दिली त्यांनी तात्काळ मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन शी संपर्क साधून त्यांना ही माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळ गाठुन तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मलकापूर उप जिल्हा रुग्णालयात हलविला. दरम्यान या घटनेत कृष्णा एकनाथ बावस्कार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा तपास पोहेकाॅ हुसेन पटेल, दिलीप तडवी करीत आहेत.