January 4, 2025
क्रीडा खामगाव चिखली जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र मुंबई विदर्भ शिक्षण शेतकरी

तलवारबाजी स्पर्धेत अनुराधा सोळंकी ची यश

खामगाव : १३ व्या राष्ट्रीय स्तरावरील व्हीलचेअर तलवारबाजी स्पर्धेत अनुराधा सोळुंके हिने २ रोप्य व १ कांस्यपदक पटकावले. ही स्पर्धा २७ मार्च २८ मार्च २०२१ ला हरियाणातील कर्नाल येथे पार पडली. यामध्ये १५ ते १८ राज्य सहभागी झाले होते, यात अनुराधा सोळंकी हिने ३ प्रकार खेळून फॉइल व सेबर प्रकारात सिल्वर मेडल व ऐपे प्रकारात ब्रांन्ज मेडल आपल्या महाराष्ट्र संघासाठी घेतले आहे. या अगोदर १२ व्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत ३ ब्राँझ पदक पटकावले होते. अनुराधा सोळंकी ही महाराष्ट्राच्या इतिहासात तलवारबाजी खेळात दिव्यांग महिला म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणारी पहिली महिला ठरली आहे. तिने महाराष्ट्राच नव्हे तर पूर्ण देशाचे नाव प्यारा ओलंपिक जागतिक व्हीलचेअर तलवारबाजी वर्ल्डकप मध्ये नाव उंचावले आहे. ह्या स्पर्धांच्या वर्ल्ड रँकिंग ५४ नंबर वर आहे. अशा प्रकारच्या रँकिंग मध्ये येणारी ती महाराष्ट्रातून या खेळात सहभागी होणारी ही पहिलीच महिला ठरली आहे. आता तिची निवड थायलंडचे होणाऱ्या व्हीलचेअर तलवारबाजी एशियन चॅम्पियनशिप मधे झाली आहे. ही स्पर्धा १२ डिसेंबर २०२१ पासून ते २० डिसेंबर २०२१ पर्यंत होणार आहे. तिच्या घरची परिस्थिती एकदम हलाखीची आहे तरीही वडिलांनी तिला शिकवले व अनुराधा एमए पर्यंत शिक्षण पूर्ण केले. एवढे मोठे मोठ्या जबाबदाऱ्या एकटा वडलांवर बघून ती स्वतःहून मजुरी करायला जायची व शाळेची फी भरायची.ती आपले य्या यशाचे श्रेय हे तलवारबाजी प्रशिक्षक संतोष शेजवळ बुलढाणा, बुलढाणा व्हीलचेअर तलवारबाजी असोसिएशन चे सचिव गणेश जाधव, व्हीलचेअर तलवारबाजी महाराष्ट्र सचिव महेंद्र हेमणे यांना देते.

Related posts

जिल्ह्याला ऑक्सिजन निर्मिती व पुरवठ्यामध्ये स्वयंपूर्ण बनवावे – डॉ राजेंद्र शिंगणे

nirbhid swarajya

चिखली अर्बनचे अध्यक्ष सतीश गुप्त यांच्यावर प्राणघातक हल्ला

nirbhid swarajya

औद्योगिक विकासाच्या माध्यमातून मागासले पण दूर करू – डॉ. हेमंत सोनारे

nirbhid swarajya
error: Content is protected !!