December 29, 2024
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय

तर मिरवणुका, आंदोलने, सभा ‘या’ कारणामुळे रद्द होणार

मुंबई: राज्यात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा टाळेबंदी लागू करण्याची वेळ येऊ नये, यासाठी गर्दी टाळणे, मुखपट्टीचा वापर करणे, समारंभ साधेपणाने साजरे करणे आदी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी जनतेला केले. नियमांची कडक अंमलबजावणी करा. राज्यात सार्वजनिक ठिकाणी कोरोना नियमांचे पालन होताना दिसत नाही. अशा ठिकाणी आंदोलने, सभा, मिरवणुका यांना परवानगी देऊ नये, असे मुख्यमंत्री म्हणाले. ज्या भागात रुग्णसंख्या वाढतेय तेथे कंटेनमेंट झोन करायची तयारी ठेवावी, असेही ठाकरे यांनी सांगितले. मास्क न वापरणे किंवा अन्य नियमांचा भंग करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करावी, असा स्पष्ट आदेशही मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिला. कोरोनाचा संसर्ग असलेल्या भागात किंवा परिसरात टार्गेटेड पद्धतीने तपासण्या करा, एकेक रुग्णाचे किमान २० तरी संपर्क शोधून काढण्याचे निर्देश दिले. व्यावसायिक संस्था, संघटनांनी एसओपीची काटेकोर अंमलबजावणी करावी. बँक्वेट हॉलमध्ये कोणी विनामास्क आढळल्यास हॉल मालकावर कारवाई करणार आहे. तसेच विवाह समारंभासाठी पोलिस परवानगी आवश्यक असणार आहे. राज्यात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना सर्वसामान्यांना लागू असून त्याला 31 मार्चपर्यंत किंवा 2 महिने मुदतवाढ देण्यात येईल. कोरोना उपचारासाठी जी क्षेत्रीय रुग्णालये करण्यात आली आहेत, त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

Related posts

अज्ञात वाहनाच्या धडकेत ३५ वर्षीय इसम ठार

nirbhid swarajya

टीम एक वादळ भारताचं या चळवळीच्या वतीने ७५ वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला

nirbhid swarajya

खामगांव पँथर स्टूडेंट फेडरेशन शहर अध्यक्षपदी अजय सारसर खामगाव शहर कार्यकारणी गठीत…

nirbhid swarajya
error: Content is protected !!