परिवाराच्या हस्ते होणारहॉस्पिटलचे उद्धघाटन
खामगाव: गत 6 वर्षापासून खामगाव शहरात 24 तास रुग्णसेवेत असलेले स्त्रीरोग तज्ञ डॉ आश्विन ढोकणे व त्यांच्या पत्नी डॉ. सौ. पूजा आश्विन ढोकणे यांच्या जलंब रोडवरील नाना नानी पार्कच्या मागे नव्याने बांधण्यात आलेल्या ढोकणे हॉस्पीटल व प्रसूतीगृह व गृहप्रवेश लोकार्पण सोहळा उद्या दिनांक 11 डिसेबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.या लोकार्पण सोहळ्याचे उद्धघाटन डॉ आश्विन ढोकणे यांच्या आई श्रीमती प्रमिला देविदास ढोकणे यांच्या शुभहस्ते होणार आहे.या सोहळ्याला अनेकाची उपस्थिती राहणार आहे.
डॉ आश्विन ढोकणे हे एमबीबीएस असून प्रसुती व स्त्री रोग तसेच वंधत्व निवारण तज्ञ आहेत. ते गेल्या 6 वर्षापासून या आजारसंबंधीत रुग्णांना सेवा देत आहेत. तर डॉ. सौ.पूजा ढोकणे( BAMS CGO) ह्यासुद्धा सेवा देतात त्यांनी सहा वर्षांपासून विविध प्रकारे उपचार करून अनेक मातांच्या चेहऱ्यावर आनंद खुलविला आहे.या अद्यावत हॉस्पिलमुळे खामगांव शहराच्या आरोग्य सेवेत आणखी भर पडली आहे.तरी डॉ ढोकणे यांच्या हॉस्पिटलच्या स्थलांतरण सोहळ्याला उपस्थित राहावे,असे आवाहन डॉ ढोकणे यांनी केले.
चौकट…
हॉस्पीटल मध्ये या सुविधा
प्रसुतिपुर्व व पश्चात चिकीत्सा व उपचार
स्त्रिरोग चिकीत्सा व उपचार
कुटूंब नियोजन कल्याण केंद्र सरकारमान्य गर्भपात केंद्र
वंध्यत्व निदान व उपचार
कॅन्सर निदान व उपचार
२४ तास आंतररुग्ण सेवा