खामगांव : तालुक्यातील गारडगाव शिवारातील डोंगरच्या पायथ्याशी एका ३२ वर्षीय इसमाचे प्रेत गावातील नागरिकांना दिसुन आले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये शंका-कुशंका व्यक्त होत आहे. नागरिकांनी याची माहिती ग्रामीण पोलिसांना देताच घटनास्थळी पोलिस स्टेशनचे एपीआय गोंदके व पोहेका कैलास चव्हाण हे घटनास्थळी दाखल झाले. घटनेची पाहणी केली असता मृतदेहाच्या काही अंतरावर चप्पल,एक दारूची छोटी बॉटल, एक गुलाबाचे फुल, ब्लाउज व एक अगरबत्तिचा पुडा असे साहित्य पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केले. मृतकांची पाहणी केली असता मृतक याने काळ्या डिझाइन चे पांढरा शर्ट व निळसर रंगाची साधी जीन्स घातलेली आहे व उजव्या हातावर संतोष व व डाव्या हातावर गुलाबाचे फुल गोंदलेले आहे मृतकाच्या जवळ एक कथ्या रंगाचे पाकीट दिसून आले. त्यामध्ये नंबर असलेल्या चिठ्ठ्या व आधार कार्ड मिळून आले यावरून त्याचे नाव संतोष टवरे रा.एकलारा भानोदा ता. संग्रामपुर येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. वृत्त लिहीपर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती.